Breaking : bolt
दोडामार्गच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष विस्ताराचा निर्धार“उपसंचालक साहेब, तुमच्या परिमंडळाचा हिशेब द्या ! तक्रारी किती, चौकशा किती, टेंडर किती अन् कारवाई किती ?”नांदेड " झेडपी " त टेंडरची फाईल धावली, RTI ची माहिती सहा महिने रेंगाळली !जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या शुभेच्छा... अन् कोल्हापुरात फार्मासिस्टच बदनाम ?सावधान ! तापाची गोळीच ‘ताप’ वाढवणारी ठरली ? बीपीची गोळीही चाचणीत नापास, FDA कडून संशयित साठा जप्तडेंग्यूचा डंख वाढतोय, पुणे राज्यात दुसरे ! जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि पुणे महापालिका प्रतिबंधात्मक यंत्रणा किती सज्ज ?सीपीआरमध्ये केस पेपरसाठी रांग लांबली, वाद वाढला अन् हाणामारी झाली !आचारसंहितेच्या कचाट्यात आता कोल्हापूरची औषध खरेदी !औषधांच्या कपाटात प्रश्नचिन्ह आणि बदल्यांच्या फाईलीत संशयाची सावली !गडचिरोलीत CS निलंबित, राज्यात CS - DHO ना ‘OPD’ ची ड्युटी, मग औषधटंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मंत्री महोदय इतके मेहरबान का ?

जाहिरात

 

अंमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत जबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

schedule31 Mar 26 person by visibility 661 categoryसांगली

सांगली प्रतिनिधी - “अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा” अभियानांतर्गत जिल्ह्यात अमली पदार्थ, गांजा व तत्सम पदार्थांची निर्मिती, साठवणूक, विक्री व वापर होणार नाही व भावी पिढीचे यापासून संरक्षण होईल, यासाठी अमली पदार्थ विरोधी समितीच्या सर्व शासकीय सदस्यांनी जबाबदारीने व गांभीर्याने कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा सचित्र अहवाल सादर करावा. तसेच, हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी तपासणी मोहीम व व्यापक जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.

जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत अमली पदार्थ प्रतिबंधक कार्यवाही, उपाययोजना व जनजागृती याबाबत आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, अमली पदार्थ विरोधी अभियानामध्ये पोलीस पाटील यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक यांनाही सहभागी करून घ्यावे. ग्रामसभेमध्ये याबाबत अधिकाधिक जनजागृती करावी. कृषि विभागाने क्षेत्र तपासणी, एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्राने चालू व बंद कारखाने तपासणी मोहीम, रेल्वेचे डबे व वाहनांवर अमली पदार्थ विरोधी जनजागृती स्टिकर्स लावणे, शाळा-महाविद्यालयांची तपासणी करणे आदिंच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा सचित्र व सविस्तर माहितीचा अहवाल सादर करावा. कामगारांमध्ये जनजागृती करावी. कोणत्याही ठिकाणी असे पदार्थ आढळले तर त्याबाबतही व्यापक प्रसिद्धी करावी. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर शाळांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले

यावेळी अमली पदार्थ अनुषंगाने कृषि, उपप्रादेशिक परिवहन, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आदि विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरजचे डॉ. राजकिरण साळुंखे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी बैठकीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती सादर केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes