महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम २०२१ नुसार सुधारित शासन निर्णयाप्रमाणे सर्व क्लिनिक, रुग्णालये, प्रसूतीगृह, प्रयोगशाळा, निसर्गउपचार केंद्र यांना बॉम्बे नर्सिंग अँक्टनुसार नोंदणी बंधनकारक
schedule21 Jul 23
person by
visibility 4502
categoryइतर
सुशांत पोवार (विशेष वृत्त) - निर्भीड पोलीस टाइम्सने सुरु केलेल्या जैव वैद्यकीय कचरा निर्मुलन चळवळीला मोठे यश प्राप्त झाले आहे कारण आरोग्य विभागाने नुकतेच बॉम्बे नर्सिंग अॅक्ट नुसार हॉस्पिटल व क्लिनिक नोंदणी बाबत नुकतेच पत्र काढण्यात आले आहे.
सर्व खाजगी व्यवसाय करणारे डॉक्टर्सना रुग्णालयसाठी बॉम्बे नर्सिंग अँक्टनुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागात रीतसर नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम २०२१ नुसार सुधारित शासन निर्णयाप्रमाणे सर्व क्लिनिक, रुग्णालये, प्रसूतीगृह, प्रयोगशाळा, निसर्गउपचार केंद्र यांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे रीतसर नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक असल्याचे पत्र काढण्यात आले आहे. त्यामुळे सर्व डॉक्टर्सनी क्लिनिक, रुग्णालये यांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्या रुग्णालयांनी व क्लिनिक यांनी नोंदणी केली आहे त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची व्यवसायासाठी परवानगी घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अधिनियमाप्रमाणे जे डॉक्टर्स रीतसर नोंदणी करणार नाहीत त्यांच्यावर बॉम्बे नर्सिंग अँक्टनुसार कारवाईचा इशारा पत्राद्वारे आरोग्य विभागाने दिला आहे.