Breaking : bolt
आरोग्याकडे दुर्लक्ष करत बजेटमध्ये ४४ टक्के कपात, आरोग्य विभाग 'राम भरोसे'उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपाय

जाहिरात

 

छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला 24 पासून प्रारंभ

schedule21 Nov 25 person by visibility 143 categoryकोल्हापूर

कोल्हापूर प्रतिनिधी - येथील एनसीसी गट मुख्यालय (कोल्हापूर) यांच्यामार्फत प्रतिवर्षाप्रमाणे 24 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत विशाळगड ते पन्हाळा या ऐतिहासिक मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांनी दिली .

या मोहिमेत बारा राज्यातील एनसीसीचे विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांच्या चार तुकड्या असणार आहेत.त्यातील एक तुकडी मुलींची तर तीन तुकड्या मुलांच्या राहणार आहेत.प्रत्येक तुकडीत 260 विद्यार्थी सहभागी असणार आहे.या मोहिमेचा कालावधी सात दिवसांचा राहणार असून सहभागी विद्यार्थ्यांना इतिहासापासून प्रेरणा मिळावी.तो कालखंड अनुभवता यावा. राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, तत्कालीन कालखंडात सैन्यदलाला कोणत्या अडचणी आल्या याची माहिती NCC च्या विद्यार्थ्यांना व्हावी. या उद्देशाने ही मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमला अतिरिक्त महासंचालक,महाराष्ट्र संचालनालय,राष्ट्रीय कॅडेट कोअर (NCC) अर्थात ADG - मेजर जनरल विवेक त्यागी तर मुलींच्या तुकडीला खा.शाहू महाराज छ.हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.चार दिवस चालणाऱ्या या मोहिमेमुळे राज्यातील विविध सहभागी एनसीसी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृती तसेच ऐतिहासिक कालखंडाची ओळख निर्माण होण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास ही श्री. पैठणकर यांनी व्यक्त केला. यावेळी कर्नल(डेप्युटी)अनुप रामचंद्रन, लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes