Breaking : bolt
सावधान ! तापाची गोळीच ‘ताप’ वाढवणारी ठरली ? बीपीची गोळीही चाचणीत नापास, FDA कडून संशयित साठा जप्तडेंग्यूचा डंख वाढतोय, पुणे राज्यात दुसरे ! जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि पुणे महापालिका प्रतिबंधात्मक यंत्रणा किती सज्ज ?सीपीआरमध्ये केस पेपरसाठी रांग लांबली, वाद वाढला अन् हाणामारी झाली !आचारसंहितेच्या कचाट्यात आता कोल्हापूरची औषध खरेदी !औषधांच्या कपाटात प्रश्नचिन्ह आणि बदल्यांच्या फाईलीत संशयाची सावली !गडचिरोलीत CS निलंबित, राज्यात CS - DHO ना ‘OPD’ ची ड्युटी, मग औषधटंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मंत्री महोदय इतके मेहरबान का ?फार्मासिस्ट शोधता शोधता अधिकारी थकले, ‘तुम्हीच सुचवा’ म्हणत तक्रारदारच अडले !700 कोटींच्या मेडिकल खरेदी प्रकरणात न्यायालयाचा दणका, सरकारी रुग्णालयांच्या टेंडर व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह !डॉक्टरांना दोषी ठरवण्याआधी आरोग्य व्यवस्थेचा ‘एक्स-रे’ करा !गणेशोत्सव, बाप्पा येतात, आवाज जातो पण गुन्ह्याची नोंद राहते !

जाहिरात

 

लाचेची मागणी करून लाच स्वीकारल्या प्रकरणी सहायक विद्युत निरीक्षक फैजुलअल्ली मुल्ला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

schedule19 Apr 22 person by visibility 28723 categoryक्राइम न्यूज

 
सुशांत पोवार - सोलापूर येथे एका कंत्राट पद्धतीने इलेक्ट्रिकलची कामे घेण्याकरिता विद्युत ठेकेदाराने नवीन फार्म सुरु केली असता त्यासाठी आवश्यक असणारे विद्युत पर्यवेक्षक परवाना तसेच विद्युत ठेकेदार परवाना मिळण्याकरिता विद्युत निरीक्षक विभाग सोलापूर येथे तक्रारदाराने अर्ज केला असता संबंधित तक्रारदाराला विद्युत पर्यवेक्षक परवाना देण्यात आला परंतु विद्युत ठेकेदार परवाना मिळण्याकरिता संबंधित तक्रारदार पाठपुरावा करीत असता यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी दिलेल्या विद्युत पर्यवेक्षक परवान्याचे बक्षिस म्हणून १०,०००/- रुपये व सध्याचे ठेकेदार परवान्याचे २२,०००/- रुपये असे मिळून ३२,०००/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता १५,०००/- रुपये स्वीकारले असताना संशयित फैजुलअल्ली मेहबूब मुल्ला वय ५३ वर्षे पद सहायक विद्युत निरीक्षक वर्ग - २ सध्या पदभार विद्युत निरीक्षक वर्ग -१ सोलापूर व कोल्हापूर जिल्हा विद्युत निरीक्षक विभाग सोलापूर यांना रंगेहात पकडण्यात आले त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
       फेब्रुवारी २०२२ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश महासचिव फारूक मन्सूर मटके यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन हि देण्यात आले होते या निवेदनामध्ये बेकायदेशीर काम करणाऱ्या व पैशाची मागणी करणाऱ्या विद्युत निरीक्षक सोलापूर एफ.एम.मुल्ला यांना चौकशी करून निलंबित करणे साठी निवेदन देण्यात आले होते. यामध्ये ते 3 ते ४ वर्षे सोलापूर येथील कार्यालयात तळ ठोकून असून संबंधित विद्युत निरीक्षक कार्यालयात येणाऱ्या सर्व प्रस्तावात काही त्रुटी नसताना सुद्धा तुमच्या प्रस्तावात कागदपत्रे कमी आहेत असे सांगून बोलावून लिपिक किंवा शिपाई मार्फत जे आर्थिक व्यवहार करतात त्यांना तत्काळ लायसन्स देतात जे पैसे देण्यास नकार देतात त्यांच्या प्रस्तावात त्रुटी लावून फाईल प्रलंबित ठेवतात. गेल्या 3 ते ४ वर्षापासून चे केलेल्या सर्व फाईल्स ची चौकशी केल्यास सत्य समोर येईल त्याची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे असे त्या निवेदनात नमूद होते.
       सदरची लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे सोलापूर जिल्ह्यात विद्युत निरीक्षक विभाग सोलापूर येथील विद्युत निरीक्षक वर्ग - १ यांच्यावर कारवाई करण्यात आली या कारवाई मध्ये मार्गदर्शन अधिकारी पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग पुणे चे सुरज गुरव यांच्या सह सापळा पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंंमलदार पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना श्रीराम घुगे, पोशि स्वप्नील सन्नके, पोशि प्रफुल्ल जानराव चापोशि सुरवसे आदी कारवाईत उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes