Breaking : bolt
"आरोग्याच्या मंदिरात पैशांचा महाप्रसाद...? रक्त तपासणी मशीन खरेदीतील ₹12.35 कोटींच्या किंमत तफावतीमागचं सत्य कोण सांगणार ?""प्रोटोकॉल ज्याचा, औषध खरेदी त्याची, मग ई-टेंडरमधील स्पर्धा नेमकी कुणासाठी ?""मक्तेदारी विरुद्ध पारदर्शकता, सुशांत पोवारांच्या निवेदनावर मुख्यमंत्री कार्यालयाची चौकशीची घंटा !"कोल्हापुरातील आरोग्य व्यवस्थेचे खरे शिलेदार बदनामीच्या फेऱ्यात.....?मंत्रीपदाच्या चर्चां दरम्यान उफाळलेला वाद, आमदार राजेश क्षीरसागरांसमोरील डॅमेज कंट्रोलचे आव्हान ?ऊसतोड कामगार महिलांची वेदनादायी वास्तवता, गर्भाशय काढण्यामागची सामाजिक शोकांतिकापुरवठा आदेशावरून जावक क्रमांक आणि दिनांक गायबमुळे निविदा प्रक्रियेच्या उलट सुलट चर्चांना उधान.....!महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करूया - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकागल तालुक्यातील चिमगावात रस्त्याचा वाद तापला, तहसीलदार कार्यालयासमोर दोन गटांची उपोषणेसमर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील आरोग्य सेवा, महाडायलिसिस अंतर्गत सेवांचा आढावा

जाहिरात

 

पुणे ग्रॅंड चॅलेंज दूर सायकलिंग स्पर्धा २०२६ अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी

schedule21 Nov 25 person by visibility 234 categoryपुणे

पुणे प्रतिनिधी - पुणे ग्रॅंड चॅलेंज दूर सायकलिंग स्पर्धा २०२६ दरम्यान स्पर्धकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गावरील डांबरीकरणाचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ तसेच शासनाच्या गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून २० नोव्हेंबर २०२५ ते २ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज सकाळी 8 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत संबंधित मार्गांवरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गांनी वाहतूक वळविण्याचा आदेश जारी केला आहे.

पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे राहतील, मोरगाव ते मुर्टी रोड काम सुरू असताना वाहतूक मोरगाव – लोणीपाटी – लोणी भापकर – पेशवे वस्ती (कोऱ्हाळे बु) – करंजेपूल – सोमेश्वरनगर अशी जाईल. मुर्ती ते चौधरवाडी फाटा रोडचे काम सुरू असताना वाहतूक मुर्ती – वाकी – करंजे – सोमेश्वरनगर अशी जाईल. तर चौधरवाडी फाटा ते निरा रोड काम सुरू असताना वाहतूक चौधरवाडी फाटा – करंजे – सोमेश्वर अशी जाईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes