Breaking : bolt
पुरवठा आदेशावरून जावक क्रमांक आणि दिनांक गायबमुळे निविदा प्रक्रियेच्या उलट सुलट चर्चांना उधान.....!महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करूया - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकागल तालुक्यातील चिमगावात रस्त्याचा वाद तापला, तहसीलदार कार्यालयासमोर दोन गटांची उपोषणेसमर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील आरोग्य सेवा, महाडायलिसिस अंतर्गत सेवांचा आढावाआरोग्य मंत्र्यांच्या धडाकेबाज कामाला अधिकाऱ्यांचा 'खो', अंतर्गत राजकारणाने मंत्र्यांचा जिल्हा होतोय बदनाम...?बच्चूभाऊ कडूंना आमदारकी मिळणार की फक्त फुगवठा ? पक्ष विलीन करणार का ? सार्वजनिक आरोग्य मंत्रीपद.......?शासनाच्या यादीवर नसणाऱ्या उपकरणांना तांत्रिक मान्यता देणाऱ्या उपसंचलकांच्या विभागीय चौकशीसाठी आज आयुक्तांना निवेदन सादरजिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. वाडीकर, डॉ. देशमुख यांच्यासह तिघे निलंबित पण ही शासनासाठी धोक्याची घंटा.....नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख निलंबित..!गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच, बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', बडा वैद्यकीय अधिकारी गजाआड

जाहिरात

 

विघ्नसंतोषी डीएचओंमुळे आरोग्य व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास ढळण्याची शक्यता ? दोषींवर बडतर्फची मागणी

schedule25 Nov 25 person by visibility 271 categoryमहाराष्ट्रक्राइम न्यूज

सुशांत पोवार (कोल्हापूर) - राज्यात बनावट औषधांचा भांडाफोड झाला आहे. महाराष्ट्रातील तब्बल ११ जिल्ह्यांमध्ये बनावट औषध विक्री होत असल्याचा धक्कादायक अहवाल एफडीएने आधीच सादर केला आहे. कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली असून ठाणे जिल्ह्यातून बनावट औषधांचं रॅकेट संपूर्ण राज्यभर चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या रॅकेटकडून विविध औषधांच्या नावाखाली मक्याच्या पावडरची गोळी विकली जात होती. अन्टीबायोटिक औषधांच्या नावाखाली रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात होता, या बनावट गोळयांमध्ये अँन्टीबायोटीक ऐवजी मक्याची पावडर आणि टालकम पावडर वापरली गेली होती. यापासून बनवलेल्या औषधांची विक्री राज्यभर केली जात होती. एकाच गोळीचं नाव आणि आवरण बदलून ९ वेगवेगळ्या नावानी या बनावट गोळीची विक्री केली जात होती, असं एफडीएच्या अहवालातून समोर आलं आहे. अझिमसिम ५००, रिक्लॅव्ह ६२५, फॉरमॉक्स एलबी ६२५, अॅमॉक्सिलिन २५०, सिप्रोफ्लोक्सिम, लिव्होफ्लोक्सिम, सेफिक्सिम, बिफोसिव्ही, नॅकलॉस, अशा विविध नावांनी ही टॅबलेट विकली जात होती.

              नुकतेच एका जिल्ह्यात टॅब अझीथ्रोमाईसिन 500 एमजीच्या गोळ्या अन्न व औषध प्रशासन वर्धा कार्यालयातर्फे सदर बॅच NOT For Standred Quality असलेने त्याची लेखी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या लेटरपॅडवर प्रकाशित झाली असताना दोन विघ्नसंतोषी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सदरच्या गोळ्या पुरवठादराने सदर औषधसाठा परत करणेविषयी पत्र दिले असलेने सदर औषधसाठा परत करणेत आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतरवेळी प्रत्येक गोष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगूनचं केली जाते माग इतकं मोठं प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अंधारात ठेवून का केलं? याची चौकशी होणे गरजेचे आहे. सदरच्या गोळ्या हायर अँटीबॉडीज असल्याने बनावट असतील तर रुग्णांच्या जीवाशी खेळ असून करोडो लोकांच्या जीवाचा खेळ समोर आला तर नागरिकांचा आरोग्य संस्थावरील विश्वास उडणार आहे. आरोग्य संस्थांमध्ये जाताना असे प्रकार घडत राहिले तर रुग्णांना मिळणारे मेडिसिनवर कसा काय विश्वास ठेवायचा? असा प्रश्न उभा राहणार आहे.

          सदर प्रकरणी खरेदी कक्षाच्या सहासंचालिका यांनी जिल्ह्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र प्रकाशित केले असून त्यामध्ये कळविले आहे कि, एका नामांकित वृत्तपत्रात दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी प्रसिध्द बातमीनुसार राज्यात ५ बोगस कंपन्यांच्या नावे ११ जिल्हयांना होतोय औषधांचा पुरवठा या मथळ्याखालील सविस्तर बातमी प्रसिध्द झाली असून यामध्ये सविस्तर विवेचन करण्यात आलेले आहे. यामध्ये पाच कंपन्यांची नांवे नमूद आहेत, त्यामध्ये ब्रिस्टल फॉम्यूर्लेशन, उत्तराखंड, रिफंट फार्मा, केरळ, बायोटेक फॉम्यूर्लेशन, उत्तराखंड, मेलवॉन वायोसायन्सेस, केरळ आणि एसएमएन लॅब, उत्तराखंड यांची नावे असून नमूद ५ कंपन्यांपैकी उत्तराखंडता पत्ता असलेल्या ब्रिस्टल कंपनीचे उत्पादन असलेल्या कंपनीचे उत्पादन असलेली अॅगॉक्सीलिन २५० ही अँटीबायोटिक्स कॅप्सूल ११ जिलहयांना पुरविण्यात आल्याचे समोर आले आहे. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये नवरात्रोत्सवात लाखो भाविक येतात, त्यामुळे अधिकची गरज असल्याने धाराशिवला ११ जिल्हयांकडून पाठविण्यात आलेली अॅगॉक्सीलिन २५० ही कैप्सूल बोगस ब्रिस्टल कंपनीचे असल्याचे उघड झाले आहे. याचप्रमाणे परमणी, रायगड, रत्नागिरी, वीड. वाशिम, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सिंधुदुर्ग, अमरावती, ठाणे व हिंगोली या जिल्हयांकडून हा साठा धाराशिव येथे पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वांना प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले होते की, दरवर्षी स्थानिक स्तरावर जिल्हयांना उपलब्ध होणा-या निधीतून स्थानिक पातळीवर जिल्हा शल्यचिकित्सक / जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडून खरेदी येत असल्याने प्रस्तुत प्रकरणी सन २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधीत उक्त नमूद ५ कंपन्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या / पुरवठा झालेल्या औषधांचा सविस्तर तपशिल आजच या कार्यालयास सादर करावा. असे पत्र प्रकाशित असून या प्रकरणी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असून कोणता गुन्हा आजपर्यंत ह्या दोन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दाखल केला हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे सदर प्रकरणी मुख्यमंत्री यांच्याकडे या प्रकरणी उपलब्ध माहितीच्या आधारे दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर सहआरोपी म्हणून शासनातर्फे केस चाळविण्याची मागणी केली आहे. तसेच गुरुवार दि. 27 रोजी आरोग्य विभागाच्या आयुक्त यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes