Breaking : bolt
"प्रोटोकॉल ज्याचा, औषध खरेदी त्याची, मग ई-टेंडरमधील स्पर्धा नेमकी कुणासाठी ?""मक्तेदारी विरुद्ध पारदर्शकता, सुशांत पोवारांच्या निवेदनावर मुख्यमंत्री कार्यालयाची चौकशीची घंटा !"कोल्हापुरातील आरोग्य व्यवस्थेचे खरे शिलेदार बदनामीच्या फेऱ्यात.....?मंत्रीपदाच्या चर्चां दरम्यान उफाळलेला वाद, आमदार राजेश क्षीरसागरांसमोरील डॅमेज कंट्रोलचे आव्हान ?ऊसतोड कामगार महिलांची वेदनादायी वास्तवता, गर्भाशय काढण्यामागची सामाजिक शोकांतिकापुरवठा आदेशावरून जावक क्रमांक आणि दिनांक गायबमुळे निविदा प्रक्रियेच्या उलट सुलट चर्चांना उधान.....!महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करूया - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकागल तालुक्यातील चिमगावात रस्त्याचा वाद तापला, तहसीलदार कार्यालयासमोर दोन गटांची उपोषणेसमर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील आरोग्य सेवा, महाडायलिसिस अंतर्गत सेवांचा आढावाआरोग्य मंत्र्यांच्या धडाकेबाज कामाला अधिकाऱ्यांचा 'खो', अंतर्गत राजकारणाने मंत्र्यांचा जिल्हा होतोय बदनाम...?

जाहिरात

 

समर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील आरोग्य सेवा, महाडायलिसिस अंतर्गत सेवांचा आढावा

schedule04 May 26 person by visibility 214 categoryसिंधुदुर्गआरोग्य विभाग

सुशांत पोवार (सिंधुदुर्ग) - डॉ.सतिश सूर्यवंशी (सहाय्यक उपसंचालक, आरोग्य, कोल्हापूर विभाग) यांनी दिनांक २ मे रोजी जाधव व दीपक वरक यांच्या समवेत ग्रामीण रुग्णालय पेंडूर–कट्टा, ता. मालवण येथे भेट देऊन महाडायलिसिस अंतर्गत सुरू असलेल्या डायलिसिस सेवांचा आढावा घेतला व सेवांच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. ग्रामीण रुग्णालय पेंडूर–कट्टा येथे महाडायलिसिस अंतर्गत एकूण ४६ क्रॉनिक रेनल फेल्युअर (सिआरएफ) रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून, त्यापैकी १३ रुग्ण सध्या नियमित उपचार घेत आहेत.  आमदार निलेश राणे यांच्या हस्ते जुलै २०२५ मध्ये डायलिसिस केंद्राचे लोकार्पण झाल्यापासून आजपर्यंत एकूण ९०४ डायलिसिस सत्रे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत.
            तसेच, ग्रामीण रुग्णालय मालवण येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत चालणाऱ्या डायलिसिस सेवांमध्ये ३५ (सिआरएफ) रुग्णांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ११ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. येथे एकूण १२०० पेक्षा अधिक डायलिसिस सत्रे यशस्वीरित्या पार पडली आहेत. MH STEMI ECG प्रकल्प, सिंधुदुर्ग अंतर्गत ग्रामीण रुग्णालय पेंडूर–कट्टा येथे एकूण १४७४ इसिजी नोंदी करण्यात आल्या असून, त्यापैकी ८० गंभीर रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये वेळेवर उपचार व आवश्यक ते रेफरल देण्यात आले. यामध्ये ६ गंभीर हार्ट अटॅक (एआयएम) प्रकरणांचा समावेश आहे.
           ग्रामीण रुग्णालय मालवण येथे एकूण ४१५६ इसिजी नोंदींपैकी १५६ गंभीर हृदयविकारग्रस्त रुग्ण ओळखण्यात आले. त्यापैकी २३ हार्ट अटॅक (STEMI) रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले. सदर कामगिरी ही आरोग्य सेवेतील सेवाभाव, समर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण असून ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यसंघासाठी हा अभिमानास्पद व प्रेरणादायी क्षण आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes