साप्ताहिक राशिभविष्य २९ मार्च २०२६ ते ४ एप्रिल २०२६ पर्यंत
schedule31 Mar 26
person by
visibility 6
categoryराशिभविष्य
मेष - दिनांक १, २ या दोन दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. कारण या दोन दिवसांत घेतलेले निर्णय फसू शकतात. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. आपल्या कामाची जबाबदारी दुसर्यावर सोडून तुमचे काम होणार नाही. तेव्हा इतरांकडून अपेक्षा ठेवूच नका. म्हणजे त्रास होणार नाही. काही वेळेला स्वत:चे काम सोडून दुसर्याचे काम करावे लागते. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा. गोष्टी अंगलट येऊ शकतात. त्यामुळे मध्यस्थी करणे टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला कामाचे नियोजन उत्तम जमेल. आर्थिकदृष्ट्या खर्च कसा कमी होईल ते पाहा. समाजमाध्यमांपासून लांब राहा. मित्र-मैत्रिणींसाठी वेळ द्याल. संततिसौख्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा.
वृषभ - दिनांक ३, ४ हे दोन दिवस शुभ नाहीत. त्यामुळे या दोन दिवसांत कामाचे नियोजन करण्यापेक्षा स्वत:ला विश्रांती कशी मिळेल ते पाहा. कारण धावपळीमुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. शिवाय इतरांवर जबाबदारी देऊन ती पार पडणारी नाही. त्यामुळे काम उशिरा झाले तरी चालेल, त्यासाठी परिपूर्ण नियोजन करा आणि मगच कामाला सुरुवात करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. चांगल्या दिवसांमध्ये सुवार्ता कळेल. शुभ गोष्टींची सुरुवात होईल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न अपेक्षेपेक्षासुद्धा चांगले असेल. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात घेतलेले निर्णय योग्य राहतील. आर्थिक ताणतणाव कमी होईल. राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. घरगुती वातावरण चांगले राहील. धार्मिक गोष्टींची आवड राहील. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन - या आठवड्यामध्ये सर्वच दिवस चांगले असल्यामुळे कोणत्याही दिवसासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार नाही. आपले काम वेळेत पूर्ण व्हावे म्हणून आत्तापर्यंत तुम्ही जो प्रयत्न करत होता तो प्रयत्न यशस्वी होईल. इतरांची मदत मिळेल. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल. कारण सध्या तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असेल. चांगल्या दिवसांमध्ये मंगलमय गोष्टी घडतील आणि याचा आनंद तुमच्या चेहर्यावर दिसून येईल. व्यवसायात मोठ्या प्रमाणात नफा होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात मानसन्मान मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. मित्र-मैत्रिणींशी मनोरंजन होईल. मुलांना वेळ द्याल. कुटुंबातील वातावरण हसतेखेळते राहील. विवाह इच्छुकांचे विवाह होतील. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. मानसिक ताणतणाव कमी होईल. आरोग्यात सुधारणा होईल.
कर्क - या सप्ताहात असा कोणताच दिवस नाही की त्या दिवशी तुम्हाला फार प्रयत्न करावे लागतील आणि त्याचा त्रास होईल. सध्या प्रयत्नांना यश मिळणार तर आहेच, शिवाय राहिलेली अपूर्ण कामेही पूर्ण होणार आहेत. आपल्याला जे करायचे आहे ते करायचेच असा तुमचा अट्टहास असेल. आपले काम पूर्ण करून इतरांनाही मदत करण्याची तुमची मानसिकता होईल. अनेक माध्यमांतून यश मिळेल. व्यवसायात आवक वाढेल. नोकरदार वर्गाला नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. खर्चाचे नियोजन व्यवस्थित करता येईल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या घडामोडींमध्ये तुमचा सहभाग राहील. कामानिमित्त नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. जोडीदाराची मदत मिळेल. मानसिक समाधान लाभेल.आरोग्य उत्तम राहील.
सिंह - दिनांक २९ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. तेव्हा काय करावे, काय करू नये याचा विचार कसला करताय. तुमचे जे काम बाकी आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवा. आतापर्यंत ज्या कामाला गती येत नव्हती त्या कामाला गती येईल. मागील काही अनुभवातून तुम्हाला शिकता तर आलेच, सध्या मात्र तो अनुभव विसरू नका. तुमचे निर्णय तुम्ही घ्या. इतरांवर अवलंबून राहू नका. चांगल्या कामासाठी उशीर लागतो हे मात्र नक्कीच आहे. व्यवसायात चढ-उतार असला तरी फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला जबाबदारी पार पाडावी लागेल. काटकसर करा. सार्वजनिक ठिकाणी माहिती नसलेल्या गोष्टींवर चर्चा करू नका. काही कारणानिमित्त नातेवाईकांशी रुसवेफुगवे झाले होते ते दूर होतील. शेजार्यांना मदत कराल. प्रकृतीत सुधारणा होईल.
कन्या - दिनांक ३०, ३१ हे दोन दिवस तसे तारेवरची कसरत करायला लावणारे आहेत. जे काम पूर्ण करण्यासाठी हाती घ्याल ते बाजूला राहील आणि दुसरेच काम करावे लागेल. त्यामुळे तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उशीर जरी झाला तरी तो चांगल्यासाठी आहे असे समजून पुढे चला. म्हणजे त्रास होणार नाही. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. कोणालाही सल्ला देत बसू नका. कोणी काय करावे, काय करू नये याचा विचार करत बसू नका. आपले काम भले नि आपण भले हे सूत्र लक्षात ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये घेतलेले निर्णय योग्य राहतील. व्यवसायात देवाणघेवाण टाळा. नोकरदार वर्गाने कामाकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक बचत करणे योग्य राहील. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जा.प्रकृतीबाबतीत निष्काळजीपणा टाळा.
तूळ - दिनांक १, २ या दिवसांत तुमची धावपळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काहीच सुचणार नाही. कुठले काम करावे, कुठले करू नये याचा विचार कराल. निर्णय घेणे अवघड होईल. अशा परिस्थितीत शांत राहून निर्णय घेणे योग्य राहील. आपल्या शब्दांची धार कमी करा. मतभेद ताणू नका, म्हणजे त्रास होणार नाही. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार नाही. कासवाच्या गतीने जावे लागेल अशी परिस्थिती या दोन दिवसांत आहे, त्यामुळे घाई करू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये कोणते काम करावे आणि करू नये हे सुचणार आहे. विनाकारण चिंता करू नका. व्यवसायात जास्त नफ्याची अपेक्षा ठेवून गुंतवणूक करणे त्रासाचे राहील. नोकरदार वर्गाला प्रथमत: कामाचा अंदाज घ्यावा लागेल, मगच सुरुवात करावी लागेल. व्यवहार जपून करा. घरगुती वातावरण चांगले राहील. योगसाधनेला महत्त्व द्या.
वृश्चिक - दिनांक ३, ४ या दोन दिवसांत तुमच्यासमोर जे प्रसंग येतील ते अनपेक्षित असतील. त्यामुळे तोंडावर ताबा ठेवा. कोणी काहीही म्हणू द्या, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. त्यामुळे काय होईल की तुम्हालाच त्रास होणार नाही. या दोन दिवसांत तुम्ही एखाद्याकडून चांगली अपेक्षा ठेवणेसुद्धा त्रासाचे राहील. त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. हे दोन दिवस पुढे कसे जातील ते पाहा. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. या कालावधीमध्ये आलेले प्रस्ताव स्वीकारा. मनासारख्या घटना घडतील. दिवस चढउताराचे असले तरी चांगल्या दिवसांमध्ये शुभ गोष्टींची सुरुवात होईल. व्यवसायात गुंतवणूक कराल. नोकरदार वर्गाने वरिष्ठांशी कामापुरतेच बोलणे योग्य राहील. खर्च कमी करा. राजकीय क्षेत्रात वर्चस्व गाजवाल. मित्र-मैत्रिणींशी सलोखा वाढेल. नातेवाईकांकडून आनंदाची वार्ता कळेल. आरोग्य चांगले राहील.
धनू - दिनांक २९ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. चांगल्या दिवसांमध्ये आपले मत इतरांना पटणारे असेल, त्यामुळे तुमचे काम विनाअडथळा पूर्ण होईल. इतरांकडून तुम्हाला जी अपेक्षा आहे ती पूर्ण होणार आहे. तुम्हाला वैयक्तिक संघर्ष करावा लागणार नाही. मित्रांची मदत मिळेल. काही वेळेला भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही निर्णय घेता, सध्या तसे होणार नाही. काम वेळेत कसे पूर्ण करता येईल याकडे तुमचे लक्ष राहील आणि ते काम पूर्ण होईल. व्यवसायात पूर्वीपेक्षा सध्याची परिस्थिती चांगली असेल. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात अडचणी येणार नाहीत. आर्थिक लाभ होईल. नातेवाईकांच्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. जोडीदाराची मदत मिळेल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य चांगले राहील.
मकर - दिनांक ३०, ३१ हे दोन दिवस धरलं तर चावतं सोडलं तर पळतं अशी परिस्थिती निर्माण होईल. काय करावे, काय करू नये हे तुम्हाला सुचणार नाही. शिवाय अशा परिस्थितीत इतरांचे मतही तुम्हाला पटणारे नसेल. आपलेच मत इतरांनी पटवून घ्यावे अशी तुमची मानसिकता राहील, ज्यामुळे घडी विस्कळीत होऊ शकते. त्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीत समतोल साधा; म्हणजे कोणालाच त्याचा त्रास होणार नाही. एखादे काम कमी झाले तरी चालेल, पण त्यासाठी घाई करू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीत तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. शेजार्यांशी असलेले मतभेद दूर होतील. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
कुंभ - षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण दुधात मिठाचा खडा पडल्यासारखे आहे. कोणतेही काम करताना सतर्कता बाळगावी लागेल. एखादी गोष्ट तुम्हाला नाही पटली तरी ती पटवून घ्यावी लागेल. कारण पर्यायी मार्ग स्वीकारल्याशिवाय गोष्टी सुरळीत होणार नाहीत हे लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार करा म्हणजे नुकसान होणार नाही. सध्या वेळ आपली नाही असे समजून पुढे चाला. जे चालले आहे ते चांगले समजून पुढे गेल्यास त्रास होणार नाही. व्यवसायात गुंतवणूक करणे नुकसानीचे राहील. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. आर्थिकदृष्ट्या फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. कुटुंबामध्ये असलेले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्या. मानसिक ताणतणाव घेऊ नका. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. प्रकृतीची काळजी घ्या.
मीन - दिनांक ३०, ३१, ३, ४ हे चार दिवस चांगले कसे जातील ते पाहा. कारण या चार दिवसांत तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते निर्णय चुकू शकतात, विचारपूर्वक निर्णय घ्या. चांगल्या गोष्टीसाठी घाई करू नका. आपल्या कामांमध्ये अडथळा येऊ नये असे जर वाटत असेल तर तुम्हाला तुमची वाणी बदलावी लागेल. गोड बोलूनच काम करून घ्यावे लागेल. तरच तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. कोणतेही व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. सध्या ताकसुद्धा फुंकून प्यावे लागेल. व्यवसायात आर्थिकदृष्ट्या नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. नोकरदार वर्गाने संवाद जपून साधा. कुटुंबाशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करा. आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा टाळा.