आरोग्य उपसंचालक झाले आरोग्य विभागाचे स्वयंघोषित मालक, आरोग्यमंत्री सिव्हील सर्जन आणि उपसंचालकांवर कारवाई करणार का ? का त्यांचाही ह्या खरेदीला पाठींबा ?
schedule03 Apr 26 person by visibility 131 categoryक्राइम न्यूजआरोग्य विभाग
सुशांत पोवार (विशेष वृत्त) - पंधरा दिवसांपूर्वीच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील जनतेला जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा देणार, अशा वल्गना राज्य सरकारने केल्या. प्रत्यक्षात स्थिती काय आहे ? एकीकडे अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्याच्या तरतुदीत सुमारे पाच हजार कोटींनी कपात करायची आणि दुसरीकडे जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवेच्या बाता मारायच्या. राज्यातील सार्वजनिक आरोग्य 'व्हेंटिलेटर'वर आहे. सरकारची आरोग्य व्यवस्था भ्रष्टाचार आणि गैरकारभाराने 'कुरतडलेली' आहे. आधी ती नीट करा आणि मग जागतिक दर्जा वगैरेच्या वल्गना करा.
राज्याचे आरोग्य मंत्री जरी कार्यक्षम आणि आरोग्य सेवेत नाविन्य आणण्यासाठी धडपडत करत असले तरी त्याच्या हाताखालचे अधिकारी त्यांना सहजासहजी मंत्री पदाचा कार्यकाल घालवू देतील असे वाटत नाही. मुंबईतील जिल्हा रुग्णालयात जैव वैद्यकीय कचरा निर्मुलनासाठी स्मोकलेस बायोमेडिकल वेस्ट इन्सीनरेटर घेण्याचा घाट घातला जात आहे पण सदरचे उपकरण आरोग्य संचालनालय, हाफकिन, एमएमजीपीए व राज्य स्तरावर निश्चित केलेल्या तांत्रिक वीनिर्देशामध्ये स्मोकलेस बायोमेडिकल वेस्ट इन्सीनरेटर आढळून येत नसल्याने उपसंचालकांनी दिलेली तांत्रिक मान्यताबाबत वाद निर्माण झाला आहे. याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभाग अध्यक्ष सुशांत पोवार यांनी आवाज उठविला असून आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांचेकडे खरेदीचा घाट घालणारे जिल्हा शल्य चिकित्सक आणि उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या निलंबनाची कारवाईसाठी निवेदन सादर केले आहे. तसेच आरोग्य भवन मुंबई येथे सोमवार दि.१३ एप्रिल रोजी आरोग्य मंत्रालयाच्या विरोधात निदर्शने उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
राज्यात संचालक, आरोग्य सेवा मुंबई व सहसंचालक खरेदी कक्ष यांच्या ५ सप्टेंबर २०२५ आणि आरोग्य मंत्री यांच्या १७ सप्टेंबर २०२५ च्या व्हीसीतील सूचनेनुसार रुग्णालयांमध्ये औषधे आणि साहित्याचा तुटवडा असल्यामुळे रुग्णालयांसाठी फक्त औषधे व साहित्य, प्रयोगशाळा रसायने, अत्यावश्यक सर्जिकल उपकरणे, छोटी हत्यारे व साहित्य वगळता इतर बाबींना तांत्रिक मान्यता न देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असताना उपसंचालकांनी स्मोकलेस बायोमेडिकल वेस्ट इन्सीनरेटर आरोग्य संचालनालय, हाफकिन, एमएमजीपीए व राज्य स्तरावर निश्चित केलेल्या तांत्रिक विनिर्देशामध्ये समाविष्ट नसताना तांत्रिक मान्यता देण्याचे धाडस करण्यात आल्याने आरोग्य मंत्रालयाचे कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सविस्तर वृत्त रविवारच्या संपादकीयमध्ये......(क्रमश:)