Breaking : bolt
आरोग्याकडे दुर्लक्ष करत बजेटमध्ये ४४ टक्के कपात, आरोग्य विभाग 'राम भरोसे'उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपाय

जाहिरात

 

नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिम २४० वाहनचालकांवर कारवाई

schedule01 Jan 26 person by visibility 27 categoryपुणे

पुणे प्रतिनिधी - वर्षअखेर व नूतन वर्ष २०२६ च्या स्वागतानिमित्त नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. या कालावधीत काही वाहनचालक मद्यप्राशन करून वेगात व धोकादायकरित्या वाहने चालवित असल्याने स्वतःच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर अशा वाहनचालकांवर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे आदेशाने तसेच पोलीस सह आयुक्त डॉ. राशीकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक शाखेमार्फत विशेष मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेतील १३ वाहतूक विभागांमार्फत एकूण ४७ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणारे २२० दुचाकीस्वार व २० चारचाकी वाहनचालक, असे एकूण २४० वाहनचालक आढळून आले. संबंधित वाहनचालकांविरोधात मा. न्यायालयात “ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह” अंतर्गत खटले दाखल करण्यात येत आहेत. यापुढेही अशाच प्रकारे विशेष मोहिमा राबविण्यात येणार असून वाहनचालकांनी मद्यप्राशन न करता वाहने चालवावीत व होणारी न्यायालयीन कारवाई टाळावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पाटील, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes