Breaking : bolt
“निधी मंजूर, तरी लाभार्थी वंचित ! सिंधुदुर्ग आरोग्य विभागाच्या कारभारावर मायकल डिसोझांचा घणाघाती हल्लाबोल !”“एका महान सुपुत्राची चिता अजून धगधगतेय… आणि सत्तेच्या लोकार्पणाची दिवाळी उजळतेय ! १८ ऑगस्टनंतर पुन्हा दौरा, मग ९ ऑगस्टची घाई कशाला..?”सावंतवाडीच्या इतिहासाचे काटे थांबले, प्रशासनाची वेळ कधी येणार ?“मंत्री - अधिकाऱ्यांची नावे पत्रिकेत झळकली… सिव्हिल सर्जन मात्र गायब !”साताऱ्यातील वाईच्या रुग्णालयात औषध की विषाचा डोस..?"ज्याने तुमच्या घरातील तीन पिढ्या सांभाळल्या... त्या डॉक्टरला तुम्ही एका झगमगत्या बोर्डासाठी विसरलात का..?"काळालाही हरवणारा शिक्षणमहर्षी...! पद्मश्री डॉ.डी. वाय.पाटील यांना 'निर्भीड पोलीस टाइम्स'ची कृतज्ञ आदरांजली"प्रश्न विचारणाऱ्यांवरच हल्ला ? आधी पत्रकारांची बदनामी, आता मंत्र्यांच्या नावाने अफवा पसरवल्याचा दावा..?"'पदे रिक्त... कारभार अतिरिक्त, महत्वाच्या पदावर कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्याऐवजी अतिरिक्त कार्यभाराची संस्कृती किती दिवस सुरु राहणार...?"औषधांशिवाय ग्रामीण रुग्णालये... नियोजनातील हलगर्जीपणाचा फटका रुग्णांना, वाढत्या जनआक्रोशासमोर आरोग्यमंत्र्यांची खरी परीक्षा..!"

जाहिरात

 

सांगली जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

schedule18 Nov 25 person by visibility 237 categoryसांगली

सांगली प्रतिनिधी - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025, विविध आंदोलने, उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दि. 30 नोव्हेंबर 2025 अखेर पर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून लागू झाला असून तो दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes