मकरंद परब (सिंधुदुर्ग) - वर्ग तीन कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणातून एकमेकांवर होणारे आरोप, औषध खरेदी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे वर्ग तीन कर्मचाऱ्यांच्या तक्रारीत प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप, औषधांचा तुटवडा, पत्रकार कर्मचाऱ्यांशी बोलतानाचे चित्रीकरणाचा गैरअर्थ काढून होणारे आरोप यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या तक्रारी कायम आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच तक्रारींचा आलेख वाढता असल्याने वेळीच आवर घातला नाही तर आरोग्य मंत्र्यांना ह्या तक्रारींमुळे भविष्यात अडचणी निर्माण करणाऱ्या आहेत.
ग्रामीण जनतेचे आरोग्य सांभाळणाऱ्या जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाची यंत्रणा हि सामान्य जनतेसाठी आधारवड आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र आणि सर्वेक्षण करणारे आरोग्य सेवक, सेविका हे त्यांच्यासाठी वैद्यकीय दूत आहेत. असे असले तरी तक्रारी दूर करण्याचे आव्हान आहे. ग्रामीण भागातील साथीचे आजार असो अथवा पुरामुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न असो, त्याठिकाणी जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणाच अगोदर पोहचत असते. परंतु मनुष्यबळ कमी असल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. औषधांची मागणी आणि पुरवठा यामध्ये खूप तफावत असल्याने पॅरासिटेमॉल सारखे महत्वाचे औषध मध्यंतरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तुटवडा जाणवला त्यामुळे वेळीच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वर्ग तीन च्या कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणातून होणाऱ्या तक्रारी आणि हस्तक्षेप यावर तोडगा निघाला नाही तर आरोग्य यंत्रणा कोलमडायला वेळ लागणार नाही.
जिल्हा परिषदेमध्ये दररोज हजारो नागरिक यांची ये जा असते त्यात बातमीसाठी तितकीच पत्रकारांची ये जा असते त्यावेळी एखादा शासकीय कर्मचारी एका पत्रकाराची विचारपूस केली आणि दोन मिनिट बोलले तर त्याचे अंतर्गत राजकारणासाठी चित्रीकरण करून अंतर्गत राजकारणामध्ये बाहेरील व्यक्तींना ओढणे हा म्हणजे आरोग्य विभागातील सर्वात खालच्या दर्जाचे राजकारण सुरु झाले आहे. अशा निषेधार्ह प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी किमान पडू नये कारण त्यांचे पद हे सुपर क्लास वन असल्याने त्या पदाचे पवित्र अशा घटनानामध्ये पडल्याने पावित्र्य आणि दर्जा बाबत शंका उपस्थित होऊ शकते. राष्ट्रीय समाज पक्षाने याबाबत संबंधित दोषींवर बडतर्फची मागणी केल्याने गुरुवार सर्व तक्रारी आणि काही बदल्यांच्या प्रकरणी मुंबई आरोग्य भवनच्या दारात उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोमवारी याप्रकरणी सिंधुदुर्ग येथील वेंगुर्ला तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभाग संपर्क प्रमुख सुशांत पोवार यांच्या चुकीचे चित्रीकरण करून त्यांची स्वतःच्या गलिच्छ राजकारणासाठी आरोप करणऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी रास्तारोको करण्यात येणार असून सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे तसेच गुरुवार दिनांक २२ मे रोजी मुंबई आरोग्य भवन येथे बॅॅक डेटेड सह्या घेऊन झालेल्या बदल्या आणि चित्रीकरण प्रकरणी उग्र आंदोलनाचा इशारा कोकण विभाग महिला आघाडी अध्यक्षा सिमंतिनी मयेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.