सिव्हील हॉस्पीटल मिरज येथून अपहरण झालेले ३ दिवसाचे बाळ ४८ तासाचे आत हस्तगत
schedule06 May 25
person by
visibility 91
categoryक्राइम न्यूजसांगली
सांगली वार्ताहर - :- दि. १ मे रोजी सिव्हील हॉस्पीटल, मिरज येथे प्रसूती झालेल्या महीला नामे कविता समाधान आलदर, रा. कोळे, ता. सांगोला, जि. सोलापूर यांचे तीन दिवसांचे पुरुष जातीचे बाळ एका अनोळखी महीलेने दि. ०३ मे रोजीचे १२.०० वा. चे सुमारास फिर्यादी यांचे अज्ञानपणाचा फायदा घेवून सिव्हील हॉस्पीटल, मिरज येथून अपहरण करुन नेलेबाबत महात्मा गांधी चौक पो. ठाणेस गु.र.नं. ९६/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करणेत आला होता. सदरचा गुन्हा हा गंभीर व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील स्वरुपाचा असल्याने तो उघडकीस आणणेचे अनुषंगाने संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तसेच सुनिल गिड्डे, सहा. पोलीस निरीक्षक, वा.शा, मिरज (चार्ज) यांनी पोलीस ठाणेकडील नमूद पथकाकडील अधिकारीच अंमलदार यांना तात्काळ सदर गुन्हयाचे घटनास्थळी जावून तांत्रिक माहीती संकलीत करून तिचे विश्लेषन करुन सदर गुन्हयाचा तात्काळ छडा लावणेबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पथकाने तात्काळ कारवाई करीत सदर गुन्हयाचे घटनास्थळी जावून तेथील तांत्रिक माहीती संकलीत करुन सदरच्या अनोळखी महीलेचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे अथक प्रयत्न सुरु करुन उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजद्वारे तसेच यातील फिर्यादी व साक्षीदार यांचेकडून मिळालेल्या माहीतीवरुन सदर अज्ञात महीलेचे रेखाचित्रावरुन शोधपत्रिका तयार करुन ती समाजमाध्यमात व नागरीकांमध्ये त्याचप्रमाणे सांगली जिल्हातील सर्व पोलीस ठाणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या शेजारील जिल्हयात तसेच कर्नाटक राज्यातही प्रसारीत केली होते. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे नमूद पोलीस पथक हे उपलब्ध तांत्रिक माहीतीवरुन सदरच्या अनोळखी महीलेचा शोध घेत असताना पथकातील सहा. पोलीस निरीक्षक सुनिल गिड्ढे व पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड यांना एका सुजाण नागरीकाने पोलीस ठाणेने प्रसारीत केलेल्या शोधपत्रिकेतील माहीतीचे आधारे, महीला नामे सारा सायबा साठे हीनेच सदरचे तीन दिवसाच्या बाळाचे सिव्हील हॉस्पीटल, मिरज येथून अपहरण केले असून ती सध्या सावळज, ता. तासगांव, जि. सांगली येथे सदरचे बाळासह वास्तव्यास आहे, अशी खात्रीशीर माहीती दिली. सदर बातमीवरुन संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी-महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज व सुनिल गिड्डे, सहा. पोलीस निरीक्षक, वा.शा, मिरज (चार्ज) यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस पथकास रवाना करुन सदर महीलेस ताब्यात घेवून तिचेवर योग्य ती कारवाई करणेचे आदेश दिले. वरील प्रमाणे नमूद पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे सावळज, ता. तासगांव येथे जावून तीन पथकात विभागून सदरच्या महीलेची स्थानिक नागरीकांकडून माहीती काढून तिस पळून जाणेची संधी न देता शिताफीने ताब्यात घेवून तिचेकडे कौशल्यपूर्ण तपास करता सदरचे तीन दिवसाचे बाळ सुखरुपरीत्या मिळून आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करीत आहेत. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पोलीस पथकाने कोणताही ठोस पुरावा नसताना सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील व गंभीर स्वरुपाचा असा सदरचा गुन्हा घडले वेळेपासून अवघ्या ४८ तासाचे आत उघडकीस आणून सदरचे तीन दिवसांचे अपहारीत बाळ सुखरुपरीत्या हस्तगत करुन ते यातील फिर्यादी यांचे ताब्यात देवून एका आईची तिचे बाळासोबत भेट घडवून कर्तव्य व सामाजिक भान एकत्रितरीत्या कसे जोपासावे याचे उत्तम उदाहरण समाजापुढे सादर केले आहे. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली, प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष पथक नेमून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील गंभीर गुन्हे उघडकीस आणणेबाबत वेळोवेळी आदेशीत व मार्गदर्शन केले आहे. सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत गंभीर गुन्हे करणारे इसमांबाबत माहीती उपलब्ध करुन त्यांचेवर योग्य ती प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन सुचित केले होते.