आरोग्य विभागाची लक्तरे टांगली वेशीवर, सोलापूर मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल
schedule06 May 25
person by
visibility 267
categoryक्राइम न्यूज
सोलापूर वार्ताहर - गुरूनानक चौक येथील जिल्हा रूग्णालयातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्यास सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने यांच्याकडून "तु कोणाकडे तक्रार केली तर तुझ्या नरडीचा घोट घेतो, तुला कामावरुन काढून टाकेन' अशी धमकी देणे. फिर्यादी यांची चारीत्र्यावरुन सर्वत्र बदनामी करणे, परिणामी आदी तक्रारींवरून सदरच्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनी सदर पोलिस स्टेशन मध्ये लेखी तक्रार दिली आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने आणि विजयमाला बेले यांच्यावर सदर बझार पोलिस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार कंत्राटी महिला कर्मचाऱ्यास संबंधीतांकडून गेल्या 3 महिन्यांपासुन त्रास सुरू असल्याने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, की 4 फेब्रुवारी 2025 रोजी गुरुनानक चौक येथील जिल्हा रुग्णालयात मी काम करत असताना यातील डॉ. राखी सुहास माने आणि विजयमाला बेले यांनी तेथे येऊन मला दमदाटी केली. 'आम्ही मोठ्या पदावर आहे. आमच्या ओळखी खुप आहेत. जर तु कोणाकडे तक्रार दिली तर तुझ्या नरडीचा घोट घेतो. तुला कामावरून काढून टाकेण अशी धमकी दिली, अशा आशयाची सविस्तर तक्रार पोलिसांत दिली आहे. त्यावरून सदर बझार पोलिस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि /जगताप करत आहेत.
पोलिसांकडून तक्रारी अर्जातील काही अधिकाऱ्यांच्या नावांना अभय दिला जात असल्याची चर्चा आहे. सदरच्या पिडीत कंत्राटी महिलेने तक्रारीमध्ये आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास, त्यांची नावे सविस्तर तक्रारीमध्ये नमूद केली आहेत. परंतु सदर बझार पोलिस स्टेशन मधील एका पोलिस कॉन्स्टेबल यांनी या प्रकरणात काही अधिकाऱ्यांच्या नावांना अभय देत त्यांची नावे या गुन्ह्यातून वगळली आहे, अशी माहिती तक्रारदार यांनी दिली. त्यामुळे संबंधीत पोलिस कॉन्स्टेबल यांनी तक्रारीतील काही नावांना अभय का दिले आहे ? त्या अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा नोंद का केला नाही ? की तक्रारदार महिलेस पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडे खुद्द त्या पोलिसांविरोधात दाद मागावी लागणार का ? याबाबत आरोग्य विभागात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.