आमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे यांच्यामुळे प्रभागातील विकास कामांना गती
schedule15 May 25
person by
visibility 369
categoryकोल्हापूर
(शशिकांत शेटे वार्ताहर) - अण्णा रामगोंडा शाळा परिसर ठिकाणी भंडारे घरापासून रिंग रोड पर्यंत ढवळे हॉस्पिटल रस्त्यापासून नंदू पेंटर यांच्या घरा पर्यंत आमदार डॉ.राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून नगरोत्थान योजने अंतर्गत ५१ कोटी रुपयांच्या निधीतून इचलकरंजी शहरातील विकास कामे चालू आहेत, त्यापैकी प्रभागातील रस्त्याचे काम प्रभागात चालू आहे.आज रोजी माजी सभापती राजू बोंद्रेसो, माजी नगरसेवक संजय भंडारे, उद्योजक राजू गनवाणी, चंद्रकांत जासूद, प्रकाश लोखंडे, चंद्रकांत बागडे, राहुल शिंदे, मीना माने, हौसाबाई खामकर,आदी सह
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रभागातील नागरिकांच्या वतीने श्रीफळ वाढवून सदर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे यांनी प्रभागात केलेल्या विकास कामामुळे तसेच सदर कामाचा पाठपुरावा माजी सभापती राजू बोंद्रे यांनी करून दिल्याबद्दल महिला व नागरिकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.