शिळफाटा येथील रस्ता रुंदीकरणासाठी "आप"ने पुकारले उपोषणाचे हत्यार, १५ मे ला डॉ. पठाण बसणार उपोषणाला
schedule14 May 25
person by
visibility 161
categoryमहाराष्ट्र
खोपोली वार्ताहर - खोपोली शिळफाटा येथील आरे डेरी ते गाझी बाबा दर्गा पर्यंत मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ अतिशय अरुंद असल्याकारणाने खूप जास्त प्रमाणात अपघात होत असतात व दररोज वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे तेथील रहिवाशांना व दुकानदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
आम आदमी पार्टी तर्फे सदर रस्ता रुंदीकरणासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याबरोबर वारंवार बैठका व पत्र व्यवहार करून सुद्धा सदर रस्ता रुंदीकरणाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. सदर रस्ता लवकरात लवकर रुंदीकरण व्हावा व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान, खोपोली शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे, खोपोली शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय व इतर पदाधिकारी गुरुवार दि. १५ मे रोजी सकाळी १० वाजता खोपोली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत व सदर रस्ता लवकरात लवकर रुंदीकरण सुरू न झाल्यास आमरण उपोषण करू असे डॉ. पठाण यांनी निर्भीड पोलीस टाइम्सशी बोलताना सांगितले.