Breaking : bolt
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपकोट्यवधींचा औषध खरेदी घोटाळा उजेडात, कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची "आरोग्य भवन" वारी ?ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !केंद्र सरकारची मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे कोंडी होण्याची शक्यता, २४ तासात महाभियोग आणण्याची तयारी.....स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून कोकणात महायुतीतील बडे नेते राणे - सामंत यांच्यात तणाव.....?मागायला गेला "दाद" घातली कंबरेत "लाथ", लोकशाहीच्या आत्म्यावरचा प्रहार......बनावट औषधे तरी गुन्हा का दाखल नाही ? गुपचूप रिटर्नमुळे सार्वजनिक आरोग्य विभागाचे लाखो रुपये पाण्यात ?अवयवदान इच्छा नोंदवणे ही एक जबाबदारी बनायला हवी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरसर्वोच्च न्यायालयाचा परवाचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा विजय, निवडणूक आयोगासाठी हा मोठा झटका !शंभर दिवसांची सुधारणा विशेष मोहीमेत करवीर आरोग्य विभागाचा तृतीय क्रमांकाने सन्मान, डॉ.उत्तम मदने यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा...

जाहिरात

 

कोट्यवधींचा औषध खरेदी घोटाळा उजेडात, कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची "आरोग्य भवन" वारी ?

schedule22 Aug 25 person by visibility 97 categoryक्राइम न्यूज

सुशांत पोवार (विशेष वृत्त) - गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात औषध खरेदीतील कोट्यवधींच्या आर्थिक अनियमितता उघडकीस आल्यावर प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात औषध निर्माण अधिकारी महेश देशमुख यांना निलंबित करण्यात आले असून, वरिष्ठ आणि तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी मुंबईत वाऱ्या करत असून आरोग्य भवन येथे धाव घेतल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पालकमंत्री म्हणून त्यांची भूमिका या पार्श्वभूमीवर लक्ष वेधली गेली आहे.

                   गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना कालखंडादरम्यान शेकडो कोटींचे औषध व वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात आले. या खरेदीसाठी जिल्हा विकास निधी वापरल्याचा दावा आहे. हे घोटाळे सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांनी उघडकीस आणले. त्यांनी प्राथमिक चौकशीसाठी आदेश देत निविदा प्रक्रिया न पाळता नातेवाईक कंपन्यांना महागडे व गरज नसलेले साहित्य घेणे, बाजारभावाहून जास्त किंमती देणे या गंभीर आरोपांची नोंद केली. या घोटाळ्याच्या काळात संबंधित अधिकाऱ्यांनी मंजुरी आणि निधी वाटपाच्या प्रक्रियेत भूमिका बजावल्याची खळबळजनक बाब असून, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाने देखील या प्रकरणात मान्यता दिल्याचे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. सध्या औषध निर्माण अधिकारी देशमुख यांचा निलंबन केला गेला असून, याशिवाय शल्यचिकित्सक, सहाय्यक शल्यचिकित्सक, खरेदी समितीतील तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्यावर विभागीय चौकशी करण्याचा निर्णय झाला आहे. कारवाईपासून बचाव करण्यासाठी काही आरोपी अधिकाऱ्यांनी मंत्रालयात धाव घेतल्याची माहिती असून, प्रशासकीय वर्तुळातील स्थिती तणावपूर्ण आहे. यापूर्वीही या प्रकारच्या चौकश्या होऊनही कारवाई करण्यात आलेली नाही, अशीही टीका सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

               राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या काळात भ्रष्टाचाराबाबत पुढे आलेल्या प्रकरणात तत्काळ कारवाई केल्याच्या कार्यवाहीने अल्पावधीत जनतेच्या मनात त्यांनी एक स्थान निर्माण केले आहे. सध्या शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना राज्याचे आरोग्य खाते सांभाळणारे प्रकाश आबिटकर यांच्यावर आजपर्यंत कोणताही एक डाग न लागू देता आरोग्य खाते सभाळले असून आरोग्याबाबत नवनवीन योजना राबवून आरोग्य खात्याने कात टाकली असून आरोग्य खाते अधीक सक्षम केले आहे. आरोग्यमंत्री यांच्यासह त्यांची टीममधील स्वीय सहाय्यक तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी यांनी स्वच्छ कारभार केल्याने मुख्यमंत्री खुश आहेत पण राज्यातील काही जिल्ह्यातील अधिकारी या स्वच्छ कारभाराला हरताळ फासत असल्याने आरोग्य खाते बदनाम होत आहे तरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर बडतर्फची कारवाई झाल्यास अनेक चुकीच्या गोष्टींवर अंकुश बसू शकतो नाही तर आरोग्य मंत्री स्वच्छ कारभार करून अधिकाऱ्यांनी घाण केल्याने खाते असेच बदनाम होत राहणार

 

उद्याच्या वृत्तात

अझीथ्रोमाईसीन गोळ्यांचा घोळ बाबत सडेतोड वृत्त....

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes