बनावट औषधे तरी गुन्हा का दाखल नाही ? गुपचूप रिटर्नमुळे सार्वजनिक आरोग्य विभागाचे लाखो रुपये पाण्यात ?
schedule16 Aug 25 person by visibility 162 categoryक्राइम न्यूजकोल्हापूर

सुशांत पोवार (कोल्हापूर) - राज्यात एकीकडे पक्षचोरी, वोटचोरी आणि चिन्हचोरी वरील न्यायालयीन निर्णयाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र रुग्णांच्या जीवाशी आता खेळ होताना दिसत आहे. आजारातून बरे होण्यासाठी जी औषध आपण घेत होतो तीच औषधे आता आपल्यासाठी धोकादायक ठरत आहेत. याचे कारण म्हणजे राज्यात मध्यंतरी बनावट औषध गोळ्यांचा सुळसुळाट झाला होता. तुम्ही आजारपणातून बरे होण्यासाठी जी गोळी मेडिकल मधून घेत आहात ती तुम्हाला नक्की बरे करेल का ? की औषधांमुळेच पुन्हा एकदा दवाखान्याची पायरी चढावी लागेल, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औषधांची ही बनावटगिरी इतक्या मोठ्या प्रमाणात झाली होती की त्या गोळ्या औषधांमध्ये मक्याची पावडर, टॅलकम पावडर मिसळली जाते असे औषध प्रशासन विभागाच्या एका अहवालात सांगितले गेले आहे. यासारख्या बऱ्याच धक्कादायक बाबींचा खुलासा यातून करण्यात आला आहे. आता या प्रकारामुळे मेडिकल मधून औषध खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. बीड, धाराशिव, नगर, नागपूर याच्यानंतर आता या बोगस औषध गोळ्याच्या प्रकाराचे कनेक्शन कोल्हापूरमध्ये येऊन पोहोचले आहे. यात हैदराबाद मधल्या कंपनीचा सुद्धा यात समावेश असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्याने नेमक कनेक्शन काय आहे हे नागरिकांच्या लक्षात येत आहे. आता हा सगळा प्रकार काय आहे. औषध प्रश्न प्रशासन विभागाचे याकडे दुर्लक्ष होतेय का ? औषधांचा एवढा मोठा स्कॅम करण्यामागे नक्की कोणाचा चेहरा आहे ? तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अहवालात नक्की कोणत्या बाबी समोर आल्या आहेत आणखी काय झाले जे अजून बातमीमध्ये आले नाही त्याची सविस्तर बातमी सोमवारच्या संपादकीय मध्ये देणार आहोत पण थोडक्यात आज प्रकाशझोत....