Breaking : bolt
ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !केंद्र सरकारची मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे कोंडी होण्याची शक्यता, २४ तासात महाभियोग आणण्याची तयारी.....स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून कोकणात महायुतीतील बडे नेते राणे - सामंत यांच्यात तणाव.....?मागायला गेला "दाद" घातली कंबरेत "लाथ", लोकशाहीच्या आत्म्यावरचा प्रहार......बनावट औषधे तरी गुन्हा का दाखल नाही ? गुपचूप रिटर्नमुळे सार्वजनिक आरोग्य विभागाचे लाखो रुपये पाण्यात ?अवयवदान इच्छा नोंदवणे ही एक जबाबदारी बनायला हवी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरसर्वोच्च न्यायालयाचा परवाचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा विजय, निवडणूक आयोगासाठी हा मोठा झटका !शंभर दिवसांची सुधारणा विशेष मोहीमेत करवीर आरोग्य विभागाचा तृतीय क्रमांकाने सन्मान, डॉ.उत्तम मदने यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा...कागल तालुका आरोग्य विभागाचा महाराष्ट्र शासनाकडून गौरवरासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा त्याग आणि महाराष्ट्रातील राजकीय प्रवास....

जाहिरात

 

ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !

schedule21 Aug 25 person by visibility 42 categoryसंपादकीय

सुशांत पोवार (संपादकीय) - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतालीम म्हणून ज्या निवडणुकीकडे पाहिले जात होते त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीविरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी थेट लढत होती. मुंबईमध्ये शनिवार सायंकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असताना सोमवारी शहरात मुसळधार पावसात ही बेस्टच्या ३५ आगारात बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये ८३% मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. बेस्ट उपक्रमावर कोणाचा वचक राहणार हे आजच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या बेस्ट पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणूका मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने त्यांना वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे असे असतानाच या निवडणुकीमध्ये ठाकरेंंच्या युतीला भोपळाही फोडता आलेला नाही.

                या निवडणुकीमध्ये ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल लागला आहे. ठाकरेंना या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. सर्वच्या सर्व जागा भाजपाने जिंकल्या असून हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली आहे. बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या सर्वाधिक १२ जागा आल्या आहेत तर भाजपाच्या ९ जागा निवडून आल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. शशांकराव पॅनलला १२ जागा, प्रसाद लाड पॅनलला ९ जागा, मनसे शिवसेना शून्य जागा असे सर्व २१ च्या २१ जागा समृद्धी पॅनलने जिंकल्या आहेत. उत्कर्ष पॅनल मधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मनसेने निवडणूक लढवली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने ९ आणि मनसेन २ जागा लढवल्या. मात्र त्यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, द इलेक्ट्रिक युनियन एससी एसटी वेलफेअर असोसिएशन आणि बहुजन एम्प्लॉईज युनियन या पाच संघटनांंचे सहकार समृद्धी पॅनल एकत्र येऊन लढत आहेत. तर मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे उत्कर्ष पॅनल यांच्या विरोधात उभे ठाकले होते. सोमवारी मतदानाच्या दिवशी १५ हजार १२३ मतदारांपैकी १२ हजार ६५६ मतदारांनी मतदान केले. जागा दाखवली असे म्हणत भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना टोमणा मारला आहे.

                  बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरे ब्रँँड २१ समोर शून्य असे वाक्य लाड यांनी पोस्ट केलेल्या फोटोत आहे. तसेच पुढे ० - २१ म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत असे ही लाड यांनी शेअर केलेल्या फोटोत म्हटले आहे. फेसबुक वर उबाठा आता तरी हवेतून खाली या असा खोचक सल्ला प्रसाद लाड यांनी दिला आहे. निकाल लागण्या आधीच प्रसाद लाड यांनी विजय १०० टक्के मिळणार आहे असा विश्वास व्यक्त केला होता तार ज्या पद्धतीने मोठा पाऊस असतानाही ८३.६९ टक्के मतदान झाले हा परिवर्तनाचा विजय आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला असंतोष आणि आम्ही दिलेली वचने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कामगारांनी केलेले हे भरघोस मतदान आहे. २१ पैकी २१ जागा आम्ही जिंकू आणि हा विजय कामगारांसाठी समर्पित असेल असे लाड यांनी म्हटले होते. त्यांनी व्यक्त केलेला विश्वास खरा ठरला आहे. महापालिकेचे चित्र बदलेल की महापालिका निवडणुकीत देखील भाजपा - ठाकरे ब्रँडचा सुपडा साफ करेल हे पुढील निवडणुकीत स्पष्ट होईल...........

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes