सिमंतिनी मयेकर (सिंधुदुर्ग संपादक) - रक्तदाबाऐवजी कर्करोगाचे औषध दिले गेल्यामुळे मानखुर्द मधील एका वृध्द गृहस्थाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वरील बातमी फक्त वाचली आणि अंगावर भीतीने शहारे आले. खर बोलायचं झालं तर आपल्याकडे प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या पदव्यांचा आभ्यास पूर्ण करावा लागतो व त्याप्रमाणे परीक्षा देऊन पदवी प्राप्त करावी लागते. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, वकील, फार्मसिस्ट वगैरे ही यादी खूप मोठी आहे पण आपण वरील फक्त उदाहरणं दिली आहेत. आता जर डॉक्टर ने इंजिनिअर च काम करायचं ठरवलं किंवा इंजिनिअर ने डॉक्टर च काम करायचं ठरवलं तर चालेल काय ? पण आपल्याकडे सगळं वेगळच चाललेलं दिसतंय. आपण आज याच मुद्यावर लिहिणार आहोत.
वरील जी औषधालयाची धक्कादायक बातमी समोर आली यावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते ती म्हणजे औषधालयाचा पदवीधारक वेगळाच असतो व दुकानात औषधे देणारे वेगळेच असतात. अक्षरशः त्या व्यक्ती १० वी किंवा १२ वी झालेल्या असतात आता त्यांना डॉक्टर ने दिलेल्या priscription (प्रिस्क्रिप्शन) तर वाचता आल्या पाहिजेत ना ? डॉक्टर लिहून देणार एक औषध आणि ही औषध दुकानातील कामगार मुले देणार दुसरच औषध. ज्या व्यक्ती सुशिक्षित आहेत त्यांना ही औषधे समजतील पण ज्या व्यक्तींना लिहिता वाचता येत नाही किंवा ज्या व्यक्ती वृध्द आहेत त्यांनी काय करायचं ? म्हणून आजकाल डॉक्टर सुद्धा सांगतात की औषधे विकत घेतल्यावर आम्हाला परत आणून दाखवा.
यामध्ये Schedul H1 Drugs असं ज्या औषधांना म्हणतात ती औषधे डॉक्टरांच्या priscription (प्रिस्क्रिप्शन) शिवाय मिळूच शकत नाहीत. उदाहरणार्थ: Alprazolam :to treat anxiety disorders & panic disorder (झोप येण्यासाठी), Amlodipin to treat high blood pressure (रक्तदाबासाठी), Acyclovir antifungal (बुरशीचे संक्रमण), Antibiotics are widely used in the treatment & prevention of infections (विविध जंतू संक्रमण), Diazepam to treat anxiety (चिंता त्रस्त पणा कमी होण्यासाठी) वगैरे ही झाली अगदी थोडी महत्वाची औषधे, आणखी मोठमोठ्या रोगांवरील औषधांचा विषयच वेगळा आहे. आता हा सगळा विचार आपल्यापेक्षा जास्त अन्न व औषधे प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी केला पाहिजे. पण इकडे तर सगळा सावळा गोंधळच दिसतोय. माननीय सहाय्यक आयुक्तांनी माझ्या मते या औषधालयांवर वरचेवर अनपेक्षित भेट दिली पाहिजे. हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत या लोकांची मनमानी व खाबुगिरी वाढतच राहणार आणि सर्वसामान्यांचा जीव दावणीला लागणार हे निश्चित. या सगळ्या प्रकरणात एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सर्वसामान्य जनतेनं आता जागरूकता आणि सतर्कता दाखवली पाहिजे, म्हणजे आपण ज्या औषाध दुकानातून औषधे खरेदी करतो, तेथे पदवीधर फार्मसिस्ट उपलब्ध आहे की नाही हे पाहिलं पाहिजे आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे निर्भिड पोलिस टाइम्स ची पूर्ण टीम या औषधालयांवर तसेच अन्न व औषधे प्रशासनावर आपला तिसरा डोळा ठेऊन राहणार हे नक्की
क्रमशः