Breaking : bolt
"प्रोटोकॉल ज्याचा, औषध खरेदी त्याची, मग ई-टेंडरमधील स्पर्धा नेमकी कुणासाठी ?""मक्तेदारी विरुद्ध पारदर्शकता, सुशांत पोवारांच्या निवेदनावर मुख्यमंत्री कार्यालयाची चौकशीची घंटा !"कोल्हापुरातील आरोग्य व्यवस्थेचे खरे शिलेदार बदनामीच्या फेऱ्यात.....?मंत्रीपदाच्या चर्चां दरम्यान उफाळलेला वाद, आमदार राजेश क्षीरसागरांसमोरील डॅमेज कंट्रोलचे आव्हान ?ऊसतोड कामगार महिलांची वेदनादायी वास्तवता, गर्भाशय काढण्यामागची सामाजिक शोकांतिकापुरवठा आदेशावरून जावक क्रमांक आणि दिनांक गायबमुळे निविदा प्रक्रियेच्या उलट सुलट चर्चांना उधान.....!महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करूया - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकागल तालुक्यातील चिमगावात रस्त्याचा वाद तापला, तहसीलदार कार्यालयासमोर दोन गटांची उपोषणेसमर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील आरोग्य सेवा, महाडायलिसिस अंतर्गत सेवांचा आढावाआरोग्य मंत्र्यांच्या धडाकेबाज कामाला अधिकाऱ्यांचा 'खो', अंतर्गत राजकारणाने मंत्र्यांचा जिल्हा होतोय बदनाम...?

जाहिरात

 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे राखीव प्रवर्गाचे 389 अर्ज प्राप्त - मेघराज भाते

schedule18 Nov 25 person by visibility 160 categoryसांगली

सांगली प्रतिनिधी - नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025 जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ते नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याची शेवटची तारीख दि.17.11.2025 रोजी दु. 3.00 वा. पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयास राखीव प्रवर्गाचे सांगली जिल्ह्यातून 296 व अन्य जिल्ह्यातून 93 असे एकूण 389 अर्ज जात पडताळणीसाठी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025 च्या अनुषंगाने दि. १५ व दि. १६ नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशीही निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता कार्यालय सुरु ठेवण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025 जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ते नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याची शेवटची तारीख दि. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत समिती कार्यालयास प्राप्त जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जांची नगरपरिषद व नगरपंचायत निहाय प्रकरणांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

आटपाडी नगरपंचायत -49, शिराळा नगरपंचायत - 31, आष्टा नगरपरिषद - 40, जत नगरपरिषद - 32, पलूस नगरपरिषद - 28, तासगांव नगरपरिषद - 28, इस्लामपूर/ईश्वरपूर नगरपरिषद - 56, विटा नगरपरिषद – 32 असे एकूण 296 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तर नगरपंचायत निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यातून 5 तसेच नगरपरिषद निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यातून 88 असे एकूण 93 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes