Breaking : bolt
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यातील हवेली तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी निवेदनराष्ट्रीय समाज पक्षाकडून कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी 5 जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदनबाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावरबच्चूभाऊंच्या आंदोलनाला राष्ट्रानायक महादेवजी जानकर यांचा पाठींबाप्राथमिक शिक्षणची ८ कोटींची निविदा ‘कमिशनचा कॉरिडॉर’ होऊ नये, पारदर्शक्तेसाठी रासपतर्फे निवेदनसिंधुदुर्ग जिल्ह्यात 'मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्मक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभजलजीवन मिशन अंतर्गत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाकोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 100 दिवसांच्या प्राधान्य कृती कार्यक्रमाचा आढावाजबरी चोरीचे ५ गुन्हे व मोपेड चोरीचा १ गुन्हा केलेल्या अंतरराज्य चोरट्यास अटक

जाहिरात

 

प्रधानमंत्री मुद्रा योजनेवर उद्या शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा

schedule19 Feb 24 person by visibility 97 categoryमहाराष्ट्र

सचिन भारमल (कोल्हापूर) - यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ डेव्हलपमेंट, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे प्रभाव मूल्यांकन: पश्चिम महाराष्ट्रातील अंतर्दृष्टी' या विषयावर कार्यशाळा आज दिनांक २० फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. ही कार्यशाळा सेमिनार हॉल, अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठामध्ये सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या मानवशास्त्र शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख असणार आहेत. 
            इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च यांच्यावतीने “Socio-Economic Impact Assessment of Pradhan Mantri Mudra Yojana with special reference to Western Maharashtra” या विषयावर सहयोगी संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. डॉ.कविता वड्राळे - प्रकल्प समन्वयक आणि प्रकल्प संचालक- डॉ. संतोष सुतार, डॉ. उमेश गडेकर, डॉ. गजानन साळुंखे आणि श्री. चेतन गलगे यांच्याद्वारे संशोधन प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. संशोधन प्रकल्पावर आधारित मुद्रा योजनेवरील संशोधन निष्कर्षांचे विश्लेषण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
           या कार्यशाळेमध्ये आरशेती कोल्हापूर चे संचालक श्री. कुलभूषण उपाध्ये, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री. गणेश गोडसे, प्रा., डॉ. विद्या कट्टी, डॉ. प्रतिमा पवार आणि डॉ. नितीन माळी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तरी मुद्रा योजनेचे लाभार्थी, शासकीय व निम शासकीय स्थरावरील कर्मचारी, आशा वर्कर, स्वयम् सहायता गट, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, संशोधक विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे प्र- संचालक डॉ. नितीन माळी व प्रकल्प समन्वयक डॉ. कविता वड्राळे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes