अंजुम देसाई (कोल्हापूर) - पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे बाबत तसेच घडलेले जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना जबरी चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देवून जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या सुचना दिल्या होत्या. सदर पथकामार्फत जबरी चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास सुरु असताना पथकातील पोलीस अंमलदार महेश खोत, लखनसिंह पाटील यांना आंतरराज्य आरोपी इनु उर्फ मेहंदीहसन आक्रम अली सय्यद उर्फ ईराणी रा. चिदरी रोड, हुसैन कॉलनी, बिदर, जि. बिदर, राज्य कर्नाटक याने कोल्हापूर जिल्हयात काही जबरी चोरीचे गुन्हे केले असून तो सध्या अंकली पूल, उदगांव, ता. शिरोळ येथे मोपेडवरुनफिरत आहेत अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली.
त्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक शेष मोरे व त्यांचे पथकाने अंकली पूल, उदगांव, ता. शिरोळ येथे सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचा नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव इनु उर्फ मेहंदीहसन आक्रम अली सय्यद उर्फ ईराणी वय 39, रा. चिदरी रोड, हुसैन कॉलनी, बिदर, जि.बिदर, राज्य कर्नाटक असे असलेचे सांगितले. त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्याने त्याचा साथीदार लखन उदय वसवाडे रा. शिरोळ, ता. शिरोळ याचेसह मिळून कोल्हापूर जिल्हयातील जयसिंगपूर, कुरुंदवाड, शाहुपूरी, वडगांव, गांधीनगर या ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केली असलेची कबूली दिली. तसेच त्याचे ताब्यात मिळून आलेली अॅक्सीस मोपेड ही त्याने मिरज, जि. सांगली येथून चोरी केली असलेची कबूली दिली. सदर आरोपीकडून 37 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 3 चेन व अॅक्सेस 125 मोपेड असा एकूण 4,53,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश प्राप्त झाले आहे. तसेच काही मुद्देमाल हा दुसरा आरोपी लखन वसगडे याचेकडे असलेने त्याचा शोध सुरु आहे. सदर कारवाईत खालीलप्रमाणे चेन स्नॅचिंग व मोपेड चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
यातीलआरोपी इनु उर्फ मेहंदीहसन आक्रम अली सय्यद उर्फ ईराणी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जयसिंगपूर पोलीस ठाणेच्या गुन्ह्यात ताब्यात देणेत आलेला आहे. त्यांचेकडुन आणखीन चोरी व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक बी.धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार महेश खोत, लखनसिंह पाटील, संजय कुंभार, महेश पाटील, सागर माने, विजय इंगळे, शुभम संकपाळ, संदिप बेंद्रे, विशाल चौगले, सागर चौगले, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर व तृप्ती सोरटे यांचे पथकाने केलेली आहे.