Breaking : bolt
"आरोग्याच्या मंदिरात पैशांचा महाप्रसाद...? रक्त तपासणी मशीन खरेदीतील ₹12.35 कोटींच्या किंमत तफावतीमागचं सत्य कोण सांगणार ?""प्रोटोकॉल ज्याचा, औषध खरेदी त्याची, मग ई-टेंडरमधील स्पर्धा नेमकी कुणासाठी ?""मक्तेदारी विरुद्ध पारदर्शकता, सुशांत पोवारांच्या निवेदनावर मुख्यमंत्री कार्यालयाची चौकशीची घंटा !"कोल्हापुरातील आरोग्य व्यवस्थेचे खरे शिलेदार बदनामीच्या फेऱ्यात.....?मंत्रीपदाच्या चर्चां दरम्यान उफाळलेला वाद, आमदार राजेश क्षीरसागरांसमोरील डॅमेज कंट्रोलचे आव्हान ?ऊसतोड कामगार महिलांची वेदनादायी वास्तवता, गर्भाशय काढण्यामागची सामाजिक शोकांतिकापुरवठा आदेशावरून जावक क्रमांक आणि दिनांक गायबमुळे निविदा प्रक्रियेच्या उलट सुलट चर्चांना उधान.....!महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करूया - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकागल तालुक्यातील चिमगावात रस्त्याचा वाद तापला, तहसीलदार कार्यालयासमोर दोन गटांची उपोषणेसमर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील आरोग्य सेवा, महाडायलिसिस अंतर्गत सेवांचा आढावा

जाहिरात

 

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोडी लिपीचे प्रशिक्षण

schedule21 Nov 25 person by visibility 237 categoryसांगली

सांगली प्रतिनिधी -  दैनंदिन कार्यालयीन कामकाजात जुने मोडी लिपीमधील दस्तऐवजाचे वाचन मदतीचे ठरू शकते. नागरिकांना जातीचे दाखले देत असताना पुराव्यासाठी जन्म, मृत्यू नोंदी, महसूल पुरावे इत्यादी दस्तऐवज उपलब्ध करुन देण्याकरिता अधिकारी व कर्मचारी यांना मोडी लिपीचे वाचन येणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून तसेच श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली यांच्या सहकार्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात अधिकारी, कर्मचारी यांच्याकरता मोडी लिपी प्रशिक्षणास सुरवात करण्यात आली.

प्रशिक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केला. या प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, तहसिलदार (सर्वसाधारण) लीना खरात, वुमन्स सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. लताताई देशपांडे, श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगलीचे प्राचार्य डॉ. अनिल सुगते, इतिहास विभागाच्या प्रा. डॉ. उर्मिला क्षीरसागर उपस्थित होत्या.

मोडी लिपी ही मराठी भाषेचा एक ऐतिहासिक भाग आहे. त्याचे वाचन, विश्लेषण, अभ्यास करण्यासाठी मोडी लिपी वाचता व समजता आली पाहिजे. मोडी लिपीचे प्रशिक्षण हे केवळ ऐतिहासिक दस्तऐवज समजण्यासाठीच नव्हे तर आपल्या भाषिक परंपरेचा अभिमान बाळगण्यासाठीही अत्यावश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचारी यांना मानसिंगराव कुमठेकर (मोडी लिपी तज्ज्ञ) हे मोफत मोडी लिपी प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणास 54 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes