Breaking : bolt
आरोग्यचे आयुक्त अँक्शनमोडवर, मनपाचे आरोग्य अधिकारी यांची बदली आणि चौकशीचे आदेशडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात....'मॅनेज' निविदेचा प्लॅन उधळला ? आता दोषींच्या चौकशीअंती निलंबनाची मागणी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण असताना धाराशिवमध्ये बोगस औषधे पोहचली कशी ?आयपीएस अधिकाऱ्या विरोधात महिला डॉक्टरने दाखल केला बलात्काराचा गुन्हाबोगस डॉक्टरांकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समितीचे दुर्लक्ष रुग्णांच्या जीवावर ?दिनांक १३ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ चे साप्ताहिक राशिभविष्यपुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमालातूर जिल्ह्यात येणार २ हजार २६८ कोटींची गुंतवणूकसिंधुदुर्गमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जाहिरात

 

अरबट चरबट खाल्ल्यावर पोटदुखी,गॅसेसचा त्रास होतो? ओव्याचा एक जबरदस्त उपाय.....!!!

schedule26 Oct 24 person by visibility 183 categoryआयुर्वेद

सध्या लोकांमध्ये उलट-सुलट खाण्याचा ट्रेण्ड वाढत चालला आहे. मसालेदार तळकट पदार्थ खाल्ल्यामुळे बरेच जण आजारी पडतात. शिवाय पोटाचे विकारही वाढतात, यावर उपाय म्हणून आपण ओव्याचा वापर करून पाहू शकता. सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये होतो. पदार्थाची चव वाढवण्यासाठी शिवाय पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी ओव्याचा वापर केला जातो.
               जर आपण पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त या विकारांपासून त्रस्त असाल तर, ओव्याचा सोपा उपाय करून पाहा. ओव्याला त्याच्या आयुर्वेदीक कारणांमुळे बहुगुणी देखील म्हटले जाते. पोटाचे विकार वाढल्यावर ओव्याचा वापर कसा करावा याची माहिती क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट पलक नागपालने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे
पोटाचे विकार वाढल्यावर ओव्याचा वापर कसा करावा ?
         जेवल्यानंतर ओवा खा, ओव्याचा चहा प्या,
ओव्याचा चहा तयार करण्याची सोपी कृती म्हणजे सर्वप्रथम, एका भांड्यात एक कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा ओवा घाला. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. आपण त्यात लवंग आणि तुळशीची पानं देखील घालू शकतो. चहा गाळणीने गाळून घ्या, व जेवल्यानंतर प्या.
ओवा खाण्याचे फायदे
          पचन सुधारते, जेवल्यानंतर ओवा खाल्ल्याने पचन सुधारते. ज्यामुळे पोटाचे विकार होत नाही. ओव्यामध्ये थायमॉल कंपाउंड असते, जी पाचक एंजाइम सोडण्यात मदत करतात आणि पोटात गॅस निर्मिती कमी करण्यास मदत करतात. ओव्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. छातीतील जळजळ कमी होते ओव्यामध्ये अँटी-ऍसिडिक गुणधर्म असतात, ज्यामुळे ॲसिडिटीमुळे होणारी छातीत जळजळ कमी होते. शिवाय पोटदुखीपासूनही आराम मिळतो. यासाठी आपण सकाळच्या चहामध्ये चहापत्ती सोबत ओवा देखील घालू शकता. यामुळे गॅसेसचा त्रास होणार नाही.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes