Breaking : bolt
विघ्नसंतोषी डीएचओंमुळे आरोग्य व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास ढळण्याची शक्यता ? दोषींवर बडतर्फची मागणीसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक यांनी घेतला वर्धा जिल्हा आढावाअण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज सुरळीत, नवीन 'एलओआय' देण्याची प्रक्रीया लवकरच सुरु होणारलैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा विषयावर शिबिर संपन्नसिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल आढावा बैठक संपन्नपुणे ग्रॅंड चॅलेंज दूर सायकलिंग स्पर्धा २०२६ अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारीआदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्यासाठी सामंजस्य करारसिंहगड परिसरातील वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश जारीस्पर्धा परीक्षेच्या तयारीतून निश्चित व्यक्तिमत्त्व विकास - जिल्हाधिकारी अमोल येडगेछत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला 24 पासून प्रारंभ

जाहिरात

 

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

schedule21 Mar 25 person by visibility 254 categoryसांगली

सुशांत पोवार (कोल्हापूर) - विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 20 मार्च 2025 ते 3 एप्रिल 2025 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 20 मार्च 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून लागू झाला असून तो दि. 3 एप्रिल 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes