Breaking : bolt
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यातील हवेली तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी निवेदनराष्ट्रीय समाज पक्षाकडून कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी 5 जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदनबाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावरबच्चूभाऊंच्या आंदोलनाला राष्ट्रानायक महादेवजी जानकर यांचा पाठींबाप्राथमिक शिक्षणची ८ कोटींची निविदा ‘कमिशनचा कॉरिडॉर’ होऊ नये, पारदर्शक्तेसाठी रासपतर्फे निवेदनसिंधुदुर्ग जिल्ह्यात 'मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्मक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभजलजीवन मिशन अंतर्गत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाकोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 100 दिवसांच्या प्राधान्य कृती कार्यक्रमाचा आढावाजबरी चोरीचे ५ गुन्हे व मोपेड चोरीचा १ गुन्हा केलेल्या अंतरराज्य चोरट्यास अटक

जाहिरात

 

महाराष्ट्रातील अनेक पीएचसी स्वतःच करत आहेत "बायो मेडिकल वेस्ट" ची विल्हेवाट, एमपीसीबी गप्पचे कारण काय ?

schedule25 May 25 person by visibility 113 categoryमहाराष्ट्र

सुशांत पोवार (विशेष वृत्त) - राज्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील बायोमेडिकल वेस्टची योग्य पद्धतीने उचल होत, त्याची विल्हेवाट लागावी, या उद्देशाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून अनेकवेळा वरिष्ठांना पत्रे पाठवून निधीची मागणी करण्यात आली. पण वातानुकूलित कक्षात बसून संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवर आमचे बारकाईने लक्ष असल्याचे भासविणाऱ्या य जबाबदार अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपलीच दाखविली जात असल्याचे वास्तव आहे.

                    राज्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील बायोमेडिकल वेस्टची योग्य पद्धतीने उचल होत नाही, त्याची विल्हेवाट लागावी, या उद्देशाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून अनेकवेळा पत्रव्यवहार करून निधीची मागणी करण्यात आली. पण वातानुकूलित कक्षात बसून संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवर आमचे बारकाईने लक्ष असल्याचे भासविणाऱ्या या जबाबदार अधिकाऱ्यांकडून राज्यातील अनेक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपलीच दाखविली जात असल्याचे वास्तव आहे. बायो मेडिकल वेस्ट हे मनुष्यांसह प्राण्यांसाठी हाणीकारकच आहे. इतकेच नव्हे तर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्या गेल्यास गावात एखादी रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही गप्प का ?

             बायोमेडिकल वेस्ट मनुष्यासह प्राण्यासाठी घातक असल्याने त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे; पण वारंवार निधीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्वतःच खोल खड्डा तयार करून जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांत डीप बरियल पीटच्या माध्यमातून बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती काही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पत्रान्वये कळविली आहे. या प्रकरणी जिल्हा स्तरीय समितीने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes