Breaking : bolt
महाराष्ट्र हादरला! बापाने दोन मुलींना रात्रभर उलटं टांगलं, पुढे खूपच भयानक घडलं, धक्कादायक कारण...आरोग्याकडे दुर्लक्ष करत बजेटमध्ये ४४ टक्के कपात, आरोग्य विभाग 'राम भरोसे'उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळली

जाहिरात

 

महाराष्ट्र हादरला! बापाने दोन मुलींना रात्रभर उलटं टांगलं, पुढे खूपच भयानक घडलं, धक्कादायक कारण...

schedule28 Mar 26 person by visibility 43 categoryसंपादकीय

सुशांत पोवार (संपादकीय) - त्या दोघींचे आजोबा घराचा दरवाजा वाजवत होते आपल्याला आत येऊ देण्याची विनंती करत होते तर त्या दोघींचे आई-वडील घरात निवांत झोपले होते आणि या दोन सख्या बहिणी जीवाच्या आकतांन ओरडत होत्या सानिका पाणी मागत होती पण तिच्या ओरडण्याकडे, पाणी मागण्याकडे कोणीच लक्ष दिलं नाहीये काही वेळान आजोबांनी दार वाजवणं सोडून दिलं रात्र उलटून गेली आणि सकाळी दार उघडलं तेव्हाही या दोघी तशाच अवस्थेत होत्या उलट्या लटकवलेल्या अवस्थेत, या दोघींचे आई-वडील सुद्धा तिथेच होते निवांत झोपलेले या दोघींची शुद्ध हरपलेली बघून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी १० वर्षाच्या स्थानिकाला मृत घोषित केलं तर ११ वर्षांची अनुजा बेशुद्धच होती. ऐकायला विचित्र वाटेल पण या दोघींना उलटं लटकवलेलं त्यांच्याच बापानं दादू यमगर्ण, चोरीचा संशय, पोटच्या मुलींचा छळ आणि एका मुलीचा मृत्यू सांगलीत घडलेली ही घटना नेमकी आहे काय निर्भीड पोलीस टाइम्सच्या संपादकीयमधून एक नजर......
            आटपाडीच्या बनपुरी जवळच्या बनपुरी बाळेवाडी रस्त्यावर यमगर वस्ती आहे इथं दादू हैबत यमगर यांच कुटुंब राहतं, दादू त्यांची पत्नी राणी आई-वडील आणि वर्षा अनुजा सानिका माही आणि पृथ्वीराज ही त्यांची मुलं असह्य कुटुंब यमगर कुटुंब मोलमुजरी करून उदर निर्वाह करायचं मुलं जवळच्या शाळेत शिकायला होती २५ मार्चला मुलं शाळेतून घरी आली आणि घराजवळ खेळत होती संध्याकाळी साडेचार ते पाच च्या दरम्यान दादू यमगरच्या शेजाऱ्यान दादूच्या घरी धाव घेतली आणि सानिका आणि अनुजा या तुमच्या मुलींनी आमच्या घरात चोरी केली असा आळ घेतला यावरून दोन्ही कुटुंबामध्ये भांडण सुरू झालं शेजाऱ्यान आपल्या मुलींवर चोरीचा संशय घेतल्यान संतापलेल्या दादून आपल्या दोन्ही मुलींना मारहाण करायला सुरुवात केली त्यावरच न थांबता त्यानं आपल्या पोटच्या मुलींचे हातपाय बांधले आणि संध्याकाळी सहाच्या आसपास त्यांना घराच्या पत्र्याच्या अँगलला उलटं टांगलं, या अवस्थेत काठीन मारायला सुरुवात केली बराच वेळ मुलींना मारहाण केल्यानंतर दादू थांबला पण त्याने मुलींना खाली उतरवलं नाही काही वेळान दहा वर्षांच्या सानिकाला तहान लागली तिन मला पाणी द्या मला तहान लागली आहे अशी हाक आपल्या वडिलांना दिली पण दगडाच काळीज असणाऱ्या निर्दयी दादूला आणि त्याच्या बायकोला आपल्या मुलींची दया आली नाही पण आजोबा हैबत यमगर पुढे आले त्यांनी मुलींना पाणी देण्याचा प्रयत्न केला पण दादून त्यांना ढकलून दिलं काही वेळान रात्र झाली तरी सुद्धा दादून आपल्या मुलींना खाली घेतलं नाही सानिका आणि अनुजाला त्रास व्हायला लागला त्या दोघी ओरडायला लागल्या पण त्यांचा बाप दादून ना स्वतः लक्ष दिलं ना कुणाला लक्ष देऊ दिलं धक्कादायक गोष्ट म्हणजे या दोन्ही मुली तशाच उलटं टांगलेल्या अवस्थेत असताना हे सगळं कुटुंब त्याच घरात जेवलं त्यानंतर आजी आजोबा बाहेर अंगणात झोपायला गेले पण या लटकवलेल्या मुलींच्या खालीच त्यांचे आई-वडील रात्रभर झोपले त्यांच्या लहान भावंडांनाही तिथेच झोपवलं रात्रभर या दोन्ही बहिणी लटकवलेल्या अवस्थेत होत्या त्यांच्या आजोबांनी रात्री काही वेळा दार वाजवलं पण दादून दार उघडलं ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता. या मुलीचे आजोबा दोघींकडे गेले त्यांनी त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला पण दादून स्वतः वडिलांवर कोयत्याने हल्ला केला. त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली त्यानंतर थोड्या वेळाने या मुलींचा चुलता घरी आला त्यानं दोघींना उलटं लटकवलेल्या अवस्थेत पाहिलं आणि त्यांना खाली उतरवलं. दोघीही बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यानं या दोघींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात ऍडमिट केलं. तेव्हा सानिकाला मृत घोषित केलं तर अनुजावर उपचार सुरू झाले. सानिकाचा मृत्यू झाल्याचं समजल्यावर यमगर कुटुंबीयांनी तिचा मृतदेह ताब्यात मिळवण्यासाठी घाई केली आणि आपली एक मुलगी उपचार घेत असतानाच सानिकावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली. पण दुपारी दोन च्या आसपास बेशुद्ध असलेल्या अनुजाला शुद्ध आली. डॉक्टरांनी तिला नेमकं काय झालं याबद्दल विचारणा केली तेव्हा तिन डॉक्टरांना आपल्याला आणि आपल्या लहान बहिणीला झालेली मारहाण त्यानंतर रात्रभर उलटं टांगून ठेवणं साधं पाणी सुद्धा न देणं याबद्दल सांगितलं. डॉक्टरांनी हा सगळा प्रकार तातडीन आटपाडी पोलिसांना कळवला तातडीन पोलिसांच पदक हॉस्पिटलमध्ये दाखल झालं आणि त्यांनी अनुजा कडून आणखीन माहिती घ्यायला सुरुवात केली. बापानच पोटच्या मुलींसोबत केलेला हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी थेट यमगर वस्ती गाठली आणि अंत्यसंस्कार होण्याआधीच स्थानिकाचा मृतदेह ताब्यात घेतला. तो पोस्टमार्टम साठी पाठवला आणि या सगळ्या यमगर कुटुंबाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीत वडिलांनीच मुलींना केलेली अमानुष मारहाण त्यांना मिळून न दिलेली मदत या गोष्टी समोर आल्या पण एक प्रश्न होताच आपल्याच पोटच्या मुलींना एवढी मारहाण आणि एवढी अमानुष वागणूक देण्याचं कारण काय होतं कुणी सोडवायचा प्रयत्न का केला नाही तर या मुलीच्या कुटुंबीयांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दादू यमगर हा दारूच्या नशेत होता त्याला दारूच प्रचंड व्यसन होतं सानिका आणि अनुजा हाताला लागलेली एखादी दुसरी वस्तू उचलायच्या आणि त्यांच्या सतत सतत तक्रारी दादूकडे यायच्या. बुधवारी सुद्धा अशीच तक्रार आली आणि चिडलेल्या दादून त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यानं या दोघींना लटकवल्यानंतर घरातल्या सगळ्यांना धमकी दिली. जर कोणी मध्ये आलं तर कोयत्यान तोडून टाकेल. तरीही या मुलीच्या आजोबांनी दोघींना सोडवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्यावर सुद्धा त्यांना हल्ला केला. नुसतं लटकवून ठेवल्यानं मुलींना काय होणार नाही असं घरच्यांना वाटलं होतं त्यामुळे त्यांनीही फार हालचाल केली नाहीये. मुलीच्या आजीने दिलेल्या माहितीनुसार पोरी बाहेरच काय काय चोरायच्या आणि गावातली माणसं कायम बोलायची मग त्यांचा बाप म्हणायचा रोज कुणाचं भरून द्यायचं तुम्हाला मी आता टांगणार आहे आठ दिवस त्या पळत होत्या पण बुधवारी हाताला लागल्या आम्हाला वाटलं बांधून काय मरतात का त्यात त्यांच्या बापान मारून टाकायची धमकी दिलेली सकाळी या मुलींना उतरवलं तेव्हा अनुजाला पाणी दिलं पण स्थानिकाला शुद्धच नव्हती हॉस्पिटलला गेल्यावर स्थानिकाचा मृत्यू झाल्याचं कळालं स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या या बातम्यानुसार यमगर कुटुंबियांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता पण अनुजान शुद्धीत येऊन दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणाच सत्य समोर आणलं
           दादू यमगरन हा सगळा प्रकार दारूच्या नशेत केला दादू यमगरला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर आटपाडी पोलीस स्टेशन मध्ये मुलीच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे तर धाकट्या मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे. सगळ्या कुटुंबाची चौकशी केली जाणार असून अनुजाची स्थिती अजूनही नाजूक आहे. तिच्या मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल अशी माहिती देण्यात येत आहे. पण अगदी दोन दिवस अंगणात खेळणाऱ्या दोन बहिणींच्या मृत्यूमुळे यमगर वस्तीमध्ये भयान शांतता पसरली आहे. कारण ठरलंय एका बापान दारूच्या नशेत केलेला विचित्र प्रकार आणि त्याच्या रागाला घाबरून मुलींना काहीही होणार नाही या विचारात राहिलेलं त्यांच कुटुंब.....

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes