Breaking : bolt
नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख निलंबित..!गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच, बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', बडा वैद्यकीय अधिकारी गजाआडसायटोटॉक्सिक औषध वेस्ट धोकादायक विल्हेवाट लावणाऱ्या कोल्हापुरातील कॅन्सर रुग्णालयांचे परवाने रद्दची मागणी, एमपीसीबी सायन मुख्यालयाला निवेदन सादरकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाच्या सभापती यांच्या नूतन दालन प्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्नआरोग्य उपसंचालक झाले आरोग्य विभागाचे स्वयंघोषित मालक, आरोग्यमंत्री सिव्हील सर्जन आणि उपसंचालकांवर कारवाई करणार का ? का त्यांचाही ह्या खरेदीला पाठींबा ?सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते 'माझं गाव,आरोग्य संपन्न गाव' विभागीय कार्यशाळेचे उद्घाटनआरोग्य विभाग ऍक्शन मोडवर, थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.युवराज करपे यांचे निलंबनसाप्ताहिक राशिभविष्य २९ मार्च २०२६ ते ४ एप्रिल २०२६ पर्यंतअंमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत जबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोषकोयना-दौलत डोंगरी पर्यटन महोत्सव - २०२६ चे आयोजन

जाहिरात

 

नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख निलंबित..!

schedule08 Apr 26 person by visibility 79 categoryमहाराष्ट्रआरोग्य विभाग

नांदेड प्रतिनिधी - जिल्हा परिषदेत अनेक प्रकरणात थेट सीईओंना ओव्हरटेक करून कारभार करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यांच्या संदर्भाने आलेल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी पाहता त्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
          नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख या वारंवार कर्तव्यात कसूर करीत असल्याची बाब पुढे आली आहे. त्याचवेळी त्यांच्याविरुद्ध गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. निलंबन काळात नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांचे मुख्यालय परभणी जिल्हा रुग्णालय येथे राहील. या कालावधीत डॉ. देशमुख यांना सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. त्याचवेळी डॉ. संगीता देशमुख यांना हे निलंबन आदेश जोपर्यंत अन्मलय आहेत तोपर्यंत खाजगी नोकरीही स्वीकारता येणार नाही. एकूणच डॉ. देशमुख यांच्या विरोधातील वाढत्या तक्रारींचा ओघ पाहता निलंबनाचा हा आदेश आज ना उद्या अपेक्षितच होता असे नांदेड जिल्हा परिषदेच्या वर्तुळात बोलले जात आहे. विशेष म्हणजे नांदेड दौऱ्यावर आलेल्या अंदाज समितीच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच हे निलंबनाचे आदेश निघाले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes