वृत्तसंस्था - ठाण्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तलवार उंचावल्याप्रकरणी त्यांच्यावर आर्म अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांची काल ठाण्यात झाली. या सभेत ठाकरे यांनी तलवार उंचावली होती. याच कारणाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणाचाही तपासणी होणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून मिळाली आहे. भाषणात आक्षेपार्ह आढळल्यास याप्रकरणही गुन्हा दाखल होऊ शकते अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. उत्तरसभेआधी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेली तलवार राज ठाकरे यांनी उंचावली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात तलावर उंचावल्याने मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.