Breaking : bolt
अमेरिका एका प्रचंड मोठ्या हल्ल्याची तयारी करतो आहे का ? दुसऱ्या महायुद्धातील हिरोशिमा आणि नागासाकी वरती टाकलेल्या अणुबॉम्ब सारखी शक्यता आहे की काय ? संपादकीय विश्लेषण....महाराष्ट्र हादरला! बापाने दोन मुलींना रात्रभर उलटं टांगलं, पुढे खूपच भयानक घडलं, धक्कादायक कारण...आरोग्याकडे दुर्लक्ष करत बजेटमध्ये ४४ टक्के कपात, आरोग्य विभाग 'राम भरोसे'उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मी

जाहिरात

 

अमेरिका एका प्रचंड मोठ्या हल्ल्याची तयारी करतो आहे का ? दुसऱ्या महायुद्धातील हिरोशिमा आणि नागासाकी वरती टाकलेल्या अणुबॉम्ब सारखी शक्यता आहे की काय ? संपादकीय विश्लेषण....

schedule29 Mar 26 person by visibility 88 categoryसंपादकीय

सुशांत पोवार (संपादकीय) - अमेरिका इजराईल विरुद्ध इराण हा जो संघर्ष चालू आहे या संघर्षाला आज एक महिना पूर्ण झाला. खरं तर या संघर्ष जेव्हा हा सुरू झाला २८ फेब्रुवारीला ज्यावेळेला अमेरिका आणि इजराईल यांच्या पुरस्कृत इरान वरती पहिला हल्ला झाला त्यावेळेला ज्या प्रकारची रणनीती अमेरिकेकडून आखली गेली होती त्यानुसार खरं तर तीन ते चार दिवसांमध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या संपवायच्या होत्या. त्यांना रिझिम चेंज करायचा होता. त्यांना इराणमध्ये सत्तांतर घडून आणायचं होतं. इराण मधली धार्मिक राजवट जी १९७९ पासून आहे ती त्यांना पूर्णपणे बदलायची होती आणि ते ह्या इम्प्रेशन मध्ये होते की आम्ही हवाई हल्ले करून अशा प्रकारचा रेजिम चेंज हा त्या ठिकाणी घडून आणू शकू या स्वरूपाचा लष्करी कारवाई करण्यापूर्वी अमेरिकेकडे प्रामुख्याने दोन उदाहरणं होती ज्या उदाहरणामध्ये अमेरिकेने सहज पद्धतीने अशा पद्धतीच सत्तांतर हे घडून आणलेलं होतं. सत्तांतर घडून आणणं कि म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांच उद्दिष्ट साध्य केलेलं होतं. यापूर्वी २००१ मध्ये जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये लष्करी हस्तक्षेप केलेला होता त्यावेळेला तालिबान गव्हर्नमेंट तीन ते चार दिवसांमध्ये टॉपल करण्यात आलं. त्यामुळे त्या ठिकाणी अमेरिकेने पूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये घेतलेली होती. त्यानंतर व्हेनेजुला मधल ऑपरेशन त्यांचा अशाच पद्धतीने एका रात्रीतल ऑपरेशन ठरलं आणि माधुरला पकडण्यात आलं त्यामुळे त्यांना असं वाटलं की ज्या पद्धतीने आम्ही अफगाणिस्तान मध्ये यशस्वी ठरलो ज्या पद्धतीने आम्ही व्हेनेजुला मध्ये यशस्वी ठरलो त्याच पद्धतीने सहजपणे इराणला आम्ही टेकओवर करू शकू त्या ठिकाणी इराणमध्ये सत्तांतर घडून आणू शकू आणि आमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते प्रामुख्याने त्या ठिकाणी आम्हाला सहज अचीव् करता येतील आणि ते सुद्धा एअर अटॅकने करता येतील परंतु याच ठिकाणी ट्रम्प यांची रणनीती फसल्याच आपल्याला दिसून येत आज एक महिन्यानंतर तर निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगलट आल्यात की काय अशा प्रकारचं वातावरण हे निर्माण झालेल आहे. याच कारण असं आहे की यामध्ये सत्तांतर ते इराणमध्ये झालेला नाहीये आणि उलट त्यांनी अपेक्षा केली नव्हती की ज्या पद्धतीचा पलटवार हा इराण कडून करण्यात आलेला आहे आणि आज गेल्या एक महिन्यांपासुन अमेरिकेकडचे इंटर बॅलेस्टिक जे मिसाईल्स आहेत किंवा इंटरसेप्टर मिसाईल्स आहेत जे त्यांच्या थाळ सिस्टम मध्ये किंवा त्यांच्या पॅट्रियट सिस्टम मध्ये वापरले जातात. त्यांची संख्या आता कमी व्हायला लागलेली आहे. मात्र इराण कडचा जो मिसाईलचा साठा आहे इराण कडचा द्रोणचा साठा आहे हा कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होताना दिसून येत नाहीये आणि त्यामुळे हा संघर्ष कोणत्या दिशेला जाईल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की याच्यामध्ये ज्यांच्याकडचे शस्त्र पहिले संपतील किंवा मिसाईल पहिले संपतील तो यामध्ये अपयशी ठरेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण होण्याची किंवा शक्यता निर्माण होण्याचं आजची परिस्थिती आहे.

               आता सध्या जरी ह्या ह्या संपूर्ण संघर्षामध्ये काही पॉज आला असला विश्रांती आली असली तरी देखील यामध्ये पहिले डोनाल्ड ट्रंपनी सांगितलं की आम्ही ४८ तासाची मुदत देतोय नंतर ती मुदत वाढवली नंतर तिनी पाच दिवसांची मुदत दिली आणि त्यानंतर ते असं सांगतायत की आता ६ एप्रिल पर्यंत आम्ही इरानवरती अटॅक करणार नाहीये याचं कारण असं अमेरिकेकडून सांगितलं जात आहे की आता इरान हा तडजोडीसाठी तयार आहे. इरान चर्चा करण्यासाठी तयार आहे इरान बरोबरच्या चर्चा प्रगती पथावरती आहेत आणि त्यामुळे आणि त्यांनी हा प्रस्ताव जो आहे तो पाकिस्तानच्या माध्यमातून इरानला दिलेला आहे आणि आमच्या टर्म्स कंडिशन ह्या इरान एक्सेप्ट करायला तयार आहेत आता या सगळ्या गोष्टींना इराणने आउटराइटली रिजेक्ट करून टाकलय या सगळ्या प्रस्तावाला त्यांनी केराची टोपरी दाखवली ते असं म्हणतात की कोणत्याही प्रकारच्या चर्चा चालू नाहीये आम्ही कोणत्या प्रकारची तडजोड करायला तयार नाही आहोत उलट आता इराणने आपल्याच काही टर्म्स कंडिशन टाकलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की अमेरिका आता रिसविंग एडला आहे आणि आम्ही या संघर्षामध्ये आम्ही आता टर्म्स कंडिशन डिक्टेट करू आणि त्यामधली सगळ्यात महत्त्वाच्या काही टर्म्स कंडिशन इराण कडून टाकल्या गेल्यात त्यामध्ये हा जो एक महिन्याचा सगळा जो खर्च झालेला आहे प्रचंड नुकसान झालाय आर्थिक असेल त्याच्यामध्ये किंवा वित्तीय म्हणा किंवा जीवितहानी झालेली आहे या सगळ्यांची नुकसान भरपाई अमेरिकेने द्यायची ही पहिली त्यांनी टर्म्स त्याच्यामध्ये कंडिशन टाकलेली आहे दुसरी कंडिशन त्यांनी अशी टाकलेली आहे की अमेरिकेने भविष्यामध्ये कधीही इराणवरती अटॅक नाही करायचा कधीही नाही ही दुसरी कंडिशन टाकली तिसरी टाकली त्यानी की स्टेट ऑफ हार्मूज वरती आमचे सार्वभौम अधिकार असतील आणि सार्वभौम अधिकाराला मान्यता दिली जाईल अमेरिकेकडून ही तिसरी कंडिशन त्यांनी या ठिकाणी टाकली चौथी कंडिशन जी अमेरिकेचा राग आणि आग आणखीन वाढवणारी होती ती म्हणजे अमेरिकेने आखातामधुन आपला गाशा गुंडाळायचा अमेरिकेने आपले एअर बेसेस मिलिट्री बेसेस आखातामधुन बंद करून टाकायचे आता ह्या चारही कंडिशन ज्या आहेत या चारही कंडिशन कोणत्याही परिस्थितीमध्ये ट्रंप एक्सेप्ट करणार नाही. ट्रंपने ज्या टर्म्स आणि कंडिशन टाकल्या त्यानुसार इरान आपला न्यूक्लिर प्रोग्राम जो युरेनियम चमेंटचा तो पूर्णपणे थांबवेल. इरान आपले बॅलेस्टिक मिसाईल आम्ही सांगू तेवढ्या लेव्लला कमी करून टाकेल आता या स्वरूपाचे आणि स्टेट ऑफ हार्मोस ओपन करेल अर्थात या स्वरूपाच्या कंडिशन इरान काही एक्सेप्ट करणार नाहीये त्यामुळे आता जे सांगितलं जात किंवा अशा शक्यता जे वर्तवल्या जात आहेत की हा संघर्ष आता सुटण्याच्या मार्गावरती आहे तर हा संघर्ष सुटण्याच्या मार्गावरचे कोणत्याही प्रकारचे संकेत आता मिळत नाहीयेत किंबहुना डोनाल्ड ट्रंप हे कुठेतरी चर्चेमध्ये इराणला गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा अशा स्वरूपाचा मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहेत की आम्ही आता चर्चा करतोय एक पद्धतीने इराणला गाफील ठेवण्याचा तर हा प्रकार नाहीये ना आणि असं करून डोनाल्ड ट्रम्प मे बी एप्रिल सेकंड वीकला म्हणा एका प्रचंड मोठ्या हल्ल्याच्या तयारीमध्ये तर नाहीयेत ना अशा प्रकारची शक्यता देखील अभ्यासकांकडे वर्तवली जाते आहे त्याला बाइंग द टाईम अस आपण म्हणतो म्हणजे तुम्ही चर्चेमध्ये एखाद्या शत्रू पक्षाला किंवा तुमच्या विरोधी पक्षाला गुंतवून ठेवायच त्याला सांगायचं की आम्ही आता निगोशिएशन करायला तयार आहोत चर्चा करायला तयार आहोत हा संघर्ष कुठेतरी सोडवला गेला पाहिजे आहे. दोन पावलं तुम्ही मागे जा दोन पावलं आम्ही मागे जातो आणि अशा पद्धतीने चर्चेमध्ये गुंतवून म्हणा किंवा काही प्रमाणामध्ये गाफील ठेवून म्हणा अचानक मोठा हल्ला करायचा जर अमेरिकेला या संघर्षामधुन मार्ग काढायचा असेल जर त्यांना खरच तडजोड करायची असेल तर अमेरिकेने द हजार मरीन्स जे आहे जी अमेरिकेची स्पेशलाईज फोर्स आहे ती आखाताच्या दिशेने पाठवली नसती ती पर्शियन गल्फ मध्ये पाठवली नसती. त्यांच्या ऑलरेडी तीन वॉरशिप हे पर्शियन गल्फ मध्ये आहे आणखीन दोन वॉरशिप त्यांनी पाठवल्या नसत्या त्यामुळे आता अमेरिका एका प्रचंड मोठ्या हल्ल्याची तयारी करतो आहे का ? या स्वरूपाची शक्यता निर्माण व्हायला वाव आहे आणि त्याच महत्त्वाचं कारण अस आहे की जे खर आयलँड आहे जो इराणच्या तेलाच्या निर्यातीचा कणा मानला जातो खर आयलंड म्हणजे जिथन इराणची तेलाची निर्यात होती ज्या ठिकाणवरन त्याच्यामध्ये ऑईल रिझ रिझर्व् आहेत आणि त्याच्यातन तेलाचे टँकर त्या खर गायलंड वरन निघतात हे खर गायलंड अमेरिकेला टेकओर करायच आणि ते टेकओर करायचं असेल तर त्यासाठी मरीन्स उतरवावे लागतील आणि त्या दृष्टिकोनातून अमेरिकेने तयारी केली आहे का ? हा सगळ्यात मोठा भाग आहे.

             काही अभ्यासक याही पुढे जाऊन असं म्हणत आहेत की कदाचित यामध्ये म्हणजे १९४५ ला पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर हा जपानच्या विरुद्ध केला गेला जेव्हा दुसरे महायुद्ध चालू होते हिरोशिमा आणि नागासाकी वरती अणुबॉम्ब टाकला गेला आता अशा प्रकारची शक्यता आहे की काय ? कदाचित न्यूक्लिअर ऑप्शन पण याच्यामध्ये वर्कआउट केला जातो का ? अशाही प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे आता हा संघर्ष सुटेल अशा प्रकारे दिसत नाही कारण ज्या टर्म्स आणि कंडिशन इरान कडून टाकल्या गेल्यात ज्या टर्म्स आणि कंडिशन अमेरिकेकडून टाकल्या गेल्यात या दोघांनाही एक्सेप्ट होणार नाहीयेत आणि त्यामुळे याच्यातून लगेच मार्ग निघेल अशा प्रकारची शक्यता फार कमी आहे.याच्यातून एक अत्यंत मोठा धोका हा निर्माण होतो आहे कि हा धोका असा आहे की १९७३ नंतर म्हणजे साधारणत १९७० च्या दशकाच्या पूर्वार्धामध्ये आपण असं म्हणू की जो ऑईल शॉक जगाला लागला ला होता आणि ज्याच्या माध्यमातन जे तेल निर्यात करणारे ब्रेंड क्रूड ऑईल निर्यात करणारे जे इस्लामिक देश आहेत गल्फ मधले जे देश आहेत त्यांनी तेलाच्या निर्यातीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात रेस्ट्रिक्शन आणले होते आणि त्यामुळे एकूणच जगामध्ये तेलाची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली होती १९७० च्या पूर्वी याच्यामध्ये १९७२ मध्ये आपण म्हणू त्यानंतर २००८ मध्ये अशाच प्रकारचा ऑईल शॉक जगाला मिळाला आणि त्यामध्ये तेलाची ब्रेन क्रूड ऑईल ची किंमत १५० डॉलर पर्यंत जाऊन पोहोचली होती त्यानंतर जगाला पुन्हा एकदा हा थर्ड ऑईल शॉक मिळतो की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण व्हायला फार मोठा वाव आहे. याच कारण असं आहे की स्टेट ऑफ हार्मूज हे पूर्णपणे ठप्प आहे. इराण ज्यांना मित्र देश समजतो त्यांच्या जहाजांना ट्रान्सपोर्टेशनची परमिशन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे इराणचे जहाज त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये जाता आहेत मात्र जे युरोपला तेल सप्लाय करणारे आहेत किंवा इतर देशांना तेल सप्लाय करणारे जहाज आहेत ते मात्र पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत त्यांचा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि ऑलरेडी जवळपास ७० पेक्षा जास्त देशांमध्ये तेलाच्या किंमती या १५ टक्क्यांपासून ४५ टक्क्यापर्यंत वाढल्या आहेत.

                  खुद्द अमेरिकेमध्ये तेलाची किंमत जी आहे ती पेट्रोल आणि डिझेलची किंमत ही १६ टक्क्यानी वाढली. अमेरिकेमधल्या तेलाच्या किंमती या ब्रेंड क्रूड ऑईल जे जागतिक बाजारपेठेमध्ये ब्रेंड क्रूड ऑईलची किंमत आहे त्याच्याशी कनेक्टेड आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये ब्रेन क्रुड ऑईल ची किंमत वाढली जी साधारणत ७० डॉलर २८ फेब्रुवारीला होती जी आता १२० डॉलर पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे म्हणजे याच्यातल्या वाढ सगळीकडे वाढ होण्याची परिस्थिती ही निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये ४० - ४५ टक्के वाढ झाली आहे. जवळपास ४० पेक्षा जास्त देशांमध्ये लॉकडाऊनच्या सारखी परिस्थिती केलेली आहे. काही जणांनी चार दिवसांचा आठवडा केलेला आहे. काही यांनी रेशनिंग करायला सुरुवात केली आहे त्याला म्हणजे तुम्हाला एक लिमिटेड ऑईल आणि पेट्रोल आणि डिझेल हे विकल जाईल अशा पद्धतीने उपाययोजना विशेष करून दक्षिण पूर्व आशिया असेल किंवा युरोपमध्ये देखील काही विकसित देशांमध्ये देखील आणीबाणीची परिस्थिती अशा स्वरूपाने निर्माण झाली खुद्द अमेरिकेमध्ये जो डब्ल्यूटीओ आहे यांच्याकडून जो अहवाल नुकताच आलेला आहे की अमेरिकेमध्ये महागाई जी अमेरिकेने दोन टक्क्याच्या आतमध्ये ठेवली होती ती साधारणत २०२६ - २०२७ मध्ये महागाई ही २.६ पर्यंत जाण्याचं आणि ओईसीडीचा जो रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार अमेरिकेमधली महागाई ही ४ टक्के पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर ज्यांनी हा सगळा संघर्ष सुरू केला त्यांच्याकडची महागाई एवढी वाढत असेल त्यांच्याकडे जर तेलाच्या किंमती १६ टक्क्यानी वाढल्या असतील तर आपण कल्पना करायली पाहिजे जगभरामधली कशा प्रकारची परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. जपान सारख्या देशांनी आपला जो इमर्जन्सी मधला तेलाचा साठा होता तो तेलाचा साठा इमर्जन्सी मधला वापरायला त्यांनी काढायला सुरुवात केलेली आहे. याच कारण असं आहे की जरी आज न उद्या स्टेट ऑफ हार्मोज हे ओपन झालं तरी आता ऑईल प्रोडक्शन जे आहे ते बऱ्यापैकी ठप्प झालेल आहे ते असं नाहीय की बटन दाबले की ऑईल प्रोडक्शन लगेच सुरू झालं या सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो म्हणजे एखादी रिफायनरी जर बंद पडली तर ती पुन्हा सुरू होणं ती पूर्व पदावरती येणं या सगळ्या गोष्टींना वेळ लागत असतो आणि त्यामुळे सध्या जरी परिस्थिती ही थोडी आवाक्यामध्ये असली तरी जर हा संघर्ष एप्रिल महिनाभर जरी चालला पूर्ण अजून एखादा महिनाभर चालला तर मात्र जगामध्ये आणखी भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑलरेडी कोविड मुळे रशिया युक्रेन युद्धामुळे जगाच्या आर्थिक विकासाचा कणा जो आहे तो पूर्णपणे मोडलेला आहे जगामध्ये आज जर भारत सोडला तर कोणत्याही देशाचा आर्थिक विकासाचा दर हा तीन ते चार टक्क्यांच्या वरती नाहीये अनेक देशांमधून ग्रीकल्चर प्रोडक्शन असेल इंडस्ट्री प्रोडक्शन असेल हे घटलेला आहे व्यापाराच्या बाबतीमध्ये अनेक निर्बंध हे आलेले आहेत किंवा त्याच्या संदर्भामध्ये अनेक प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागलेत अशा परिस्थितीमध्ये जर तेलाच हे गंभीर संकट निर्माण झालं तर मात्र जगामध्ये या संदर्भामध्ये एक मोठ्या मंदीच्या दिशेने जग जातय की काय अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा संघर्ष २८ दिवस होऊन गेलेले आहेत पण अजून कोणत्याही पद्धतीने सुटण्याचा मार्ग यातनं प्रामुख्याने दिसून येत नाहीये. आपण जर भारताच्या दृष्टिकोनातन विचार केला तर एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की भारत या संपूर्ण संघर्षामधून आणि या पूर्वीच्या पण संघर्षामधून खूप काही शिकलेला आहे की जशी इतर देशांमधली आणीबाणी परिस्थिती तशी भारतामध्ये नाहीये काही देशांमध्ये जरी लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती असली तरी भारतामध्ये ती नाहीये. भारतामध्ये आजही तेलाच्या किंमती ह्या अजिबात वाढलेल्या नाहीय किंबहुना त्याच्यावरची एक्साईज डुटी ही कमी करण्यात आलेली आहे जेट इंजिन वरची जी एक्सपोर्ट डुटी आहे ती वाढवण्यात आलेली आहे जेणेकरून एक्सपोर्ट त्याचा कमी व्हावा या दृष्टिकोनातून आहे. आजही आपल्याकडे साधारणत भारताकडे ७४ दिवस तेल साठवून ठेवण्याचा भारताची कॅपॅसिटी आहे आणि भारताकडे आजही दोन महिने पुरेल एवढा प्रचंड मोठा तेलाचा साठा आहे. दुसरं नुकतच इराणने हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही पाच देशांना स्टेट ऑफ हार्मोज मधून त्यांचे सीएनजी चे टँकर्स असतील किंवा तेलाचे टँकर्स असतील ते आम्ही पास होण्यासाठी आम्ही पूर्णपणे अलाऊड करणार आहोत त्यामुळे आपल्याला तो प्रचंड मोठा सपोर्ट आहे आपण रशियाकडून जे साधारणत हे संघर्ष सुरू होण्यापूर्वी भारत ११ लाख बॅरल्स हे रशियाकडून घेत होता आता आपण २४ लाख बॅरल्स रशियाकडून घ्यायला लागलो आहोत. अगदी सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतो की भारताची प्रतिदिवशी तेलाची गरज ही ५० लाख बॅरल एवढी आहे या ५० लाख बॅरल पैकी केवळ १९ लाख स्टेट ऑफ हार्मोस मधून येत होतं आणि उरलेल जे आहे ३१ लाख हे आपण बॅरल्स हे आपण जवळपास २५ देशांकडून आपण आयात करत आहोत. त्याच्यामध्ये रशिया आहे त्याच्यामध्ये व्हेनेजुला आहे त्याच्यात अमेरिका आहे त्याच्यामध्ये आफ्रिकन काही देश आहेत आणि यांच्या माध्यमातून आपण तेल घेत होतो आता हे जे १९ लाखांच आपलं थोडसं नुकसान आपल्याला वाटत होतं ते आपण कॉम्पन्न करतो रशियाकडून करून घेण्याचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतर देशांमध्ये इव्हन भारताचे शेजारी जे आहे श्रीलंका असेल पाकिस्तान असेल यांची तुलना भारताबरोबर करता नाही येणार किंवा इतर देशांमध्ये परिस्थिती युरोपियन देशांमध्ये सध्या अटीतटीची परिस्थिती आहे तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे पण लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली ती भारतामध्ये का नाही हे लक्षात घ्या याच कारण असं आहे की भारत गेल्या तीन वर्षांपासून रशियाच तेल घेत आलेल आहे. तीन प्रकारचे तेल आहेत ब्रेन क्रूड ऑईल आहे उराल ऑईल आहे आणि डब्लटी आहे अशा तीन प्रकारचे ऑईल आहेत भारताकडच्या्या रिफायनरीज आहेत या रिफायनरीज उराल ऑईल म्हणजे रशिया कडून आपण घेतो त्याला रिफाई करण्याची क्षमता आपल्याकडे आहे डब्लटी थिक ऑईल मानलं जात व्हेनेजुओलाच ज्याला थिक आणि बिटर ऑईल असं म्हणतात या तेलामधले गुणधर्म सांगण्याच्या दृष्टिकोनातन या सगळ्यांना रिफाईन करण्याची क्षमता भारतामध्ये आहे जी इतर देशांकडे नाहीये लक्षात घ्या तेलाचा जो क्रुड ऑइल ज्याला आपण म्हणतो त्या क्रुड ऑईलचा थिकनेस किती आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सल्फर इमप्युरिटीज किती आहे याच्यावरन त्याचे प्रकार पडतात आता हे ब्रेड क्रूड ऑईल जे आहे हे लाईट मानलं जातं याला स्वीट ऑईल असं मानलं जातं कारण त्या त्याच्यामधन सहजपणे पेट्रोल डिझेल तयार करता येतं मात्र हा प्रकार रशियन क्रूड ऑईलच्या बाबतीमध्ये नाहीये हा प्रकार व्हेलेजोलाच्या क्रुड ऑईलच्या बाबतीमध्ये नाहीये यांच्यामध्ये सल्फर हा जो इग्रेडियंट आहे त्याचं प्रमाण जास्त असतं उरालमध्ये आणि डब्ल्यूटीआय म्हणजे व्लेझोलाच्या ऑईल मध्ये त्याला सल्फर इम्प्युरिटीज म्हणतात या सल्फर इम्प्युरिटीज तेलामधुन बाजूला कराव्या लागतात आणि त्या बाजूला केल्यानंतर मग त्याच्यातन पेट्रोल आणि डिझेल हे तयार होतं या ज्या सल्फर इम्प्युरिटीज आहेत त्याला रिफाईन करण्याचं त्याला सेग्रगेट करण्याची क्षमता ही भारतामध्ये आहे भारताने ती टेक्नॉलॉजी विकसित केलेली आहे त्यामुळे भारताला याचा धक्का लागत नाहीये भारताला हा प्रॉब्लेम निर्माण होत नाही हे टेक्निकली तुम्ही समजावून घ्या आणि म्हणून भारतामध्ये अशा प्रकारची आणीबाणी परिस्थिती निर्माणच होऊ शकत नाही कारण आपल्याकडे दोन महिने पुरेल एवढा ऑईलचा साठा आहे आणि ऑलरेडी आता स्टेट ऑफ हार्मूज मधून आपले जहाजही यायला सुरुवात झाली आहे रशियाकडून आपण तेल घेतोय अमेरिकेकडून घेण्यात तेल घेण्याच प्रमाण आपण वाढवलेल आहे वेनेजुला कडून आपण तेल घ्यायच प्रमाण वाढवलेल आहे त्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची पॅनिक सिचुएशन नाहीये कोणत्याही पद्धतीने घाबरून जाण्याच कारण भारतीयांना नाहीये त्यामुळे आपण अत्यंत संयम बाळगणं आणि कोणत्याही प्रकारच्या स्कॅडल वरती कोणत्याही प्रकारच्या ज्याला रमर्स वरती आपण अजिबात विश्वास ठेवता कामानही ज्याला आपण पॅनिक बाईंग म्हणतो हे पॅनिक बाईक आज तुम्हाला भारतात दिसून येतय हे आपल्याला अ्सोलुटली काही अर्थ नाहीये कोणीही अशा स्वरूपाची असुरक्षित भावना ठेवता कामा नाहीये आपण कमालीचे सुरक्षित आहोत

                     आपल्याकडे त्या टेक्नॉलॉजीज आहेत डब्ल्यूटीआय म्हणजे व्हेनिजोलाच ऑईल प्युअर करण्यासाठी आणि रशियाच ऑईल प्युअर करण्याची क्षमता ही आपल्यामध्ये असल्यामुळे जी इतरांकडे नाहीये ती युरोप कडे पण नाहीये युरोपकडे केवळ ब्रेंट क्रूड ऑईल हे प्युरिफाय करण्याची क्षमता आहे म्हणूनच भारत गेल्या तीन वर्षांमध्ये युरोप ला रशिया कडून घेतलेल तेल रिफाईन करायचा आणि ते रिफाई करून युरोपला एक्सपोर्ट करायचा अगदी सहा महिन्यापूर्वीपर्यंत जर्मनीला सगळ्यात जास्त तेलाचा पुरवठादार करणारा देश हा भारत होता त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या आपण खूप काही शिकलोय आखातामध्ये पहिलं आखाती युद्ध झालं दुसर आखाती युद्ध झालं त्या ठिकाणी सातत्याने दहशतवादी हल्ले होत असतात नागरी युद्ध होत असतं पॅलेस्टाईन इजराईल मधला संघर्ष चालू असतो या सगळ्या गोष्टीतन भारत खूप खूप काही शिकलेला आहे आणि ते शिकलेल असल्यामुळे आजची आपली जी पोझिशन आहे ती कमालीची स्ट्रॉंग पोझिशन आहे आणि त्यामुळे मात्र सगळ्या भारतीयांची प्रार्थना हीच असेल की हा संघर्ष लवकरात लवकर सुटावा पण सध्या ज्या पद्धतीचे संकेत मिळत आहेत हा संघर्ष सुटण्यापेक्षा आणखीन एप्रिल सेकंड वीक मध्ये आणखीन स्ट्रॉंग बनतो की काय आणखीन त्याची तीव्रता वाढते की काय आणि याचं रूपांतर एका मोठ्या युद्धामध्ये होतं की काय किंवा याच्या माध्यमातून एखादी आर्थिक महामंदी च्या दिशेने जग जाते की काय अशा प्रकारची शक्यता किंवा संशय निर्माण करणारे वातावरण आज निर्माण झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes