संदीप कांबळे (कुपवाड):- दि.५ सोमवारी कुपवाड मध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आयोजित कै.भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय (पुरुष- महिला, किशोर-किशोरी गट) खो-खो स्पर्धा दिनांक ५ ते ८ फेब्रुवारी २०२३ रोजी द ॲम्युचर खो-खो असोसिएशन सांगली व शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुपवाड, यांनी आयोजन केले आहे
खो खो या क्रीडा स्पर्धा कुपवाड येथील अकुज ड्रीमलँड परिसरामध्ये होत असून यासाठी ७५ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहे. यापैकी २६ लाख रुपयाची बक्षीसे खेळाडूंना दिले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण ४ ग्राउंड तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी माझी नगरसेवक गजानन मगदूम, शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, उपाध्यक्ष राहुल कोल्हापुरे, व मंडळाचे सर्व सदस्य यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
कै. भाईं नेरुरकर चषक राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आहेत. विशेष उपस्थिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे आहेत. अशी माहिती स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली.
यावेळी माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी या खो-खो स्पर्धा पाहण्यासाठी गॅलरीचे नियोजन केले असून कुपवाड मधील व सांगलीतील सर्व क्रीडा प्रेमी व नागरिकांनी पाहण्यास यावे असे आवाहन केले. यावेळी सचिव गोविंद शर्मा, क्रीडा विभागाचे सचिव किरण बावडेकर, तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते युवराज जाधव, हणमंत सरगर, नितीन कारंडे ,भाऊसाहेब पाटील,योगेश हिंगमिरे, अनिल मगदूम, राजू रासकर, गणेश इंगळे व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते