Breaking : bolt
आरोग्यचे आयुक्त अँक्शनमोडवर, मनपाचे आरोग्य अधिकारी यांची बदली आणि चौकशीचे आदेशडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात....'मॅनेज' निविदेचा प्लॅन उधळला ? आता दोषींच्या चौकशीअंती निलंबनाची मागणी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण असताना धाराशिवमध्ये बोगस औषधे पोहचली कशी ?आयपीएस अधिकाऱ्या विरोधात महिला डॉक्टरने दाखल केला बलात्काराचा गुन्हाबोगस डॉक्टरांकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समितीचे दुर्लक्ष रुग्णांच्या जीवावर ?दिनांक १३ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ चे साप्ताहिक राशिभविष्यपुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमालातूर जिल्ह्यात येणार २ हजार २६८ कोटींची गुंतवणूकसिंधुदुर्गमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जाहिरात

 

युवा पिढीच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना

schedule18 Jul 24 person by visibility 213 categoryसंपादकीय

जिल्हा माहिती अधिकारी (पुणे) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. ही योजना राज्यातील १२ वी पासून पुढील सर्व प्रकारचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने करीता ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून या योजनेसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असणे आवश्यक आहे. विनाअनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना, उद्योग, महामंडळामार्फत प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कालावधीत त्यांना कुशल/ अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल.
कार्य प्रशिक्षण कालावधी ६ महिन्यांचा राहणार असून या कालावधीत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना ६ हजार रुपये, आय.टी.आय व पदविका
 उत्तीर्णांना ८ हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवारांना १० हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे आहे. उद्योगक्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे (इंटर्नशिप) उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या (इंटर्नशिप) संधी उपलब्ध होणार आहेत.
याशिवाय शासकीय योजनांची माहिती जनतेला व्हावी आणि त्या माध्यमातून जनतेला लाभ मिळावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमागे १ व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे १ असे एकूण ५० हजार योजनादूत राज्यात नेमण्यात येणार आहेत. यांचेही विद्यावेतन या योजनेतून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही युवांना कुशल, अर्धकुशल प्रकारचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरणार असून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes