सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकशाही दिनाच्या वेळेत बदल
schedule31 Jan 25
person by
visibility 110
categoryसिंधुदुर्ग
मकरंद परब (सिंधुदुर्ग) - सामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी जाणून घेवून त्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १:०० वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सकाळी ११ वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली 'जिल्हा नियोजन समिती' ची बैठक असल्याकारणाने 'लोकशाही दिन' दुपारी १:०० ऐवजी दुपारी ३:०० वाजता होणार आहे. तरी कृपया सर्व तक्रार अर्जदार, नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.