Breaking : bolt
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यातील हवेली तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी निवेदनराष्ट्रीय समाज पक्षाकडून कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी 5 जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदनबाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावरबच्चूभाऊंच्या आंदोलनाला राष्ट्रानायक महादेवजी जानकर यांचा पाठींबाप्राथमिक शिक्षणची ८ कोटींची निविदा ‘कमिशनचा कॉरिडॉर’ होऊ नये, पारदर्शक्तेसाठी रासपतर्फे निवेदनसिंधुदुर्ग जिल्ह्यात 'मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्मक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभजलजीवन मिशन अंतर्गत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाकोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 100 दिवसांच्या प्राधान्य कृती कार्यक्रमाचा आढावाजबरी चोरीचे ५ गुन्हे व मोपेड चोरीचा १ गुन्हा केलेल्या अंतरराज्य चोरट्यास अटक

जाहिरात

 

वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या तारखेत बदल

schedule29 Jan 25 person by visibility 247 categoryपुणे

आकाश भारतीय (पुणे) - महाराष्ट्र मोटार वाहन विभागातर्फे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक अभियान २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या कालावधीतील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या तारखेत बदल करण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक अभियानाचे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजन करण्यात आले असून यामध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मोटार वाहन विभागाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरीता शुक्रवार ३१ जानेवारी हा दिनांक आरक्षित केलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने शनिवार ८ फेब्रुवारी रोजी निरीक्षणाकरीता सादर करावीत.

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीकरीता ३१ जानेवारी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्यांच्या वेळेमध्ये अंशतः बदल करुन शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीचे पुर्नवेळापत्रक ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आलेले आहे, याची नोंद घ्यावी व त्यानुसार वाहन योग्यता प्रमाणपत्र आणि शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीबाबतसाठी उपस्थित रहावे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes