Breaking : bolt
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यातील हवेली तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी निवेदनराष्ट्रीय समाज पक्षाकडून कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी 5 जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदनबाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावरबच्चूभाऊंच्या आंदोलनाला राष्ट्रानायक महादेवजी जानकर यांचा पाठींबाप्राथमिक शिक्षणची ८ कोटींची निविदा ‘कमिशनचा कॉरिडॉर’ होऊ नये, पारदर्शक्तेसाठी रासपतर्फे निवेदनसिंधुदुर्ग जिल्ह्यात 'मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्मक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभजलजीवन मिशन अंतर्गत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाकोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 100 दिवसांच्या प्राधान्य कृती कार्यक्रमाचा आढावाजबरी चोरीचे ५ गुन्हे व मोपेड चोरीचा १ गुन्हा केलेल्या अंतरराज्य चोरट्यास अटक

जाहिरात

 

पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजपा आणि बविआमध्ये नालासोपाऱ्यात तुफान राडा

schedule19 Nov 24 person by visibility 262 categoryराजकीय घडामोडी

वृत्तसंस्था - पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजपा आणि बाविआमध्ये नालासोपाऱ्यात तुफान राडा झाला आहे. भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आहे. सोबत भाजपचे नालासोपाऱ्याचे उमेदवार राजन नाईक आहेत. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते विनोद तावडे यांना जाब विचारत आहेत. विरार पूर्वेला मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये हा राडा सुरू आहे. वसई-विराराचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या सर्व राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पाच कोटीच वाटप चालू आहे. मला डायऱ्या मिळाल्या आहेत. लॅपटॉप आहे. कुठे-काय वाटप झालय त्याची माहिती आहे” असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला.
            “विनोद तावडे हे राष्ट्रीय नेते आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस लाज-शरम कोळून प्याले आहेत. 48 तास आधी मतदारसंघ सोडायचा असतो, हे साधं माहित नाही आणि हे राज्याचे शिक्षण मंत्री होते” अशी टीका हितेंद्र ठाकूर यांनी केली. “त्यांनी मला 25 फोन केले. मला माफ कर, जाऊ द्या. प्लीज मला माफ कर. माझं चुकलं” असं विनोद तावडे म्हणाल्याच हितेंद्र ठाकूर यांनी दावा केला.
          “भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटायला आलाय. पोलिसांनी कारवाई करावी, त्यानंतरच आम्ही सोडू. मी कायदे-नियम पाळणारा माणूस आहे” असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. “माझं फोन बुक बघा. किती इनकमिंग कॉल आहेत त्यांचे. मला अगोदर न्यूज आलेली, विनोद तावडे पाच कोटी घेऊन येणार. डायऱ्या मिळाल्या आहेत, काय कायदेशीर कारवाई होते बघू” असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.
             “वसई रोड 5, वसई पश्चिम 4 असा त्या डायरीत उल्लेख आहे. 4 वाजता कुठे पैसे पोहोचवायचे हे सर्व त्यात लिहिलय. विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर नियमानुसार इलेक्शन अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अन्यथा उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यत ते माझ्यासोबतच इथे राहतील. मी त्यांना एकांतात भेटणार नाही. त्यांनी लोकांसमोर येऊन बोलावं” असं हितेंद्र ठाकूर म्हणाले

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes