Breaking : bolt
सावधान ! तापाची गोळीच ‘ताप’ वाढवणारी ठरली ? बीपीची गोळीही चाचणीत नापास, FDA कडून संशयित साठा जप्तडेंग्यूचा डंख वाढतोय, पुणे राज्यात दुसरे ! जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि पुणे महापालिका प्रतिबंधात्मक यंत्रणा किती सज्ज ?सीपीआरमध्ये केस पेपरसाठी रांग लांबली, वाद वाढला अन् हाणामारी झाली !आचारसंहितेच्या कचाट्यात आता कोल्हापूरची औषध खरेदी !औषधांच्या कपाटात प्रश्नचिन्ह आणि बदल्यांच्या फाईलीत संशयाची सावली !गडचिरोलीत CS निलंबित, राज्यात CS - DHO ना ‘OPD’ ची ड्युटी, मग औषधटंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मंत्री महोदय इतके मेहरबान का ?फार्मासिस्ट शोधता शोधता अधिकारी थकले, ‘तुम्हीच सुचवा’ म्हणत तक्रारदारच अडले !700 कोटींच्या मेडिकल खरेदी प्रकरणात न्यायालयाचा दणका, सरकारी रुग्णालयांच्या टेंडर व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह !डॉक्टरांना दोषी ठरवण्याआधी आरोग्य व्यवस्थेचा ‘एक्स-रे’ करा !गणेशोत्सव, बाप्पा येतात, आवाज जातो पण गुन्ह्याची नोंद राहते !

जाहिरात

 

सांगलीत ३०६ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती ; पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचा कडक इशारा

schedule20 Nov 25 person by visibility 352 categoryक्राइम न्यूजसांगली

संजय तोडकर (सांगली) :- सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गंभीर गुन्हेगारांवर कडक अंकुश ठेवण्यासाठी आज दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस मुख्यालय, सांगली येथे मोठ्या प्रमाणात आरोपी आदान–प्रदान कार्यक्रम राबविण्यात आला. मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात एकूण ३०६ आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

 
उपविभागनिहाय आरोपी संख्या :
  • सांगली – ५१
  • मिरज – ४७
  • इस्लामपूर – ५०
  • तासगाव – ४२
  • विटा – ४६
  • जत – ७०
  • एकूण – ३०६ आरोपी
 

            गेल्या पाच वर्षांत खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मोका, अंमली पदार्थ, शस्त्र अधिनियम, तसेच तडीपार कालावधी पूर्ण झालेल्या आरोपींना या मोहिमेत समाविष्ट करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान हजर आरोपींची सविस्तर माहिती घेऊन त्यांचे इंटरोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले. त्यात सध्याची नोकरी/उपजीविका, मित्रपरिवार, राहण्याचे ठिकाण, मोबाईल क्रमांक, नातेवाईकांची माहिती आदी महत्वाच्या बाबींचा समावेश होता. सर्व माहिती अद्ययावत करून पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी नोंदी मजबूत केल्या. मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व आरोपींना कडक शब्दांत इशारा देत स्पष्ट केले की “यापुढे कोणताही गुन्हा केल्यास कठोर व प्रभावी कारवाई अनिवार्य असेल.” तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना व डी.बी. पथकांना आरोपींच्या हालचालींवर निरंतर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. जामिनावर असलेल्या आरोपींची नियमित तपासणी करण्याचे, तसेच दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या किंवा वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींवर म.पो.का. कलम ५५, ५६, ५७ नुसार तडीपारीची कारवाई करण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी एमपीडीए आणि मोका अंतर्गत पुढील कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. या कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व डी.बी. पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असून रेकॉर्डवरील सर्व आरोपींवर बारीक नजर ठेवली जाणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes