वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आयुक्तांना निवेदन, डीन कार्यालयातील निविदांची गृह विभागाकडून चौकशीची मागणी
schedule20 Jun 25
person by
visibility 57
categoryकोल्हापूर
संजय पोवार - वाईकर (कोल्हापूर) - तोंडाला काळी फडकी बांधून, हातात धारदार शस्त्रे घेऊन टाकलेले दरोडे सर्वसामान्यांना सवयीचे आहेत; पण ज्याच्यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो आणि समाजामध्ये सन्मानाचे जीणे जगण्याची संधी मिळते, अशा आस्थापनेवर काम करणार्या पांढरपेशी अधिकारी - कर्मचार्यांनी दरोडा टाकण्याचा केलेला प्रयत्न सध्या कोल्हापुरात चर्चेत येतोय. कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात गेल्या 6 महिन्यातील खरेदीच्या नावाखाली ह्या कोट्यवधींच्या निविदा धमकावून घेतल्याच्या दबक्या आवाजात चर्चा आहे. त्याची पाळेमुळे खोदून काढण्याचे धैर्य गृह विभाग आणि शासनाने दाखविले, तर सीपीआर रुग्णालय आणि राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भ्रष्टाचाराचा कॅन्सर कुठवर पसरला आहे, याची कल्पना येऊ शकते. त्याची शस्त्रक्रिया करावयाची झाली, तर डीन यांच्या कार्यालयाचे चित्रीकरण समोर आले तर अनेक महाभागांच्या हातामध्ये बेड्या पडू शकतात.
विशेष म्हणजे, अशी खरेदी करण्यापूर्वी ज्या विभागासाठी ही खरेदी करण्यात येते आहे, त्या विभागाकडून त्याची मागणी आवश्यक होती का ? त्याचे बाजारातील दर तपासून पाहिले आहेत का ? प्रत्यक्षामध्ये रुग्णालयातील कारकून, दबावतंत्र वापरणारे कारस्थानी आणि काही मोजक्या तल्लख डोक्याच्या कंत्राटी अधिकार्यांनी प्रक्रियेला फाटा देऊन ही खरेदी केली. या खरेदीमध्ये केवळ कमिशन डोळ्यांसमोर ठेवून दिलेल्या या ऑर्डर्सची शक्यता असल्याने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी वर्ग करण्यात आलेला हा निधी लुटला गेला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून डीन कार्यालयाचे सिसिटीव्हीतुन काही म्होरक्यांचे उखळ पांढरे झाले तर पुढच्या निविदेतील भ्रष्ट कारभार नक्कीच थांबू शकणार त्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि त्या खात्याचे आयुक्त यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन दिले जाणार असून याची चौकशी झाल्याशिवाय कोणतेही बिल अदा केले जाऊ नये असे सांगितले जाणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.