सुशांत पोवार (संपादकीय) - आज फक्त एका हत्तीनीचा विषय नाही तर उद्या हाच विषय बाळूमामांच्या बकऱ्यांपर्यंत घोड्यांपर्यंत जाऊ शकतो किंवा आमच्या वारीतल्या बैलापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला थोडासा एक मोठा अर्थ आहे त्या ब्रॉडर वेने विचार करणं गरजेचं आहे. वनताराचा सीईओ कोल्हापूरमध्ये आल्याने पॉझिटिव्ह गोष्टी काहीतरी होतील अशी अपेक्षा होती. पण आता कळून चुकलय की सहजासहजी माधुरी परत येणार नाहीये. त्यामुळे आवाज उठवणं गरजेचं आहे. वनताराचा सीईओ जो आला होता त्याचा अटीट्युड तुम्ही बघितलाय, मी या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या, मी बऱ्याच गोष्टी मी बराच डेटा मागून घेतला, बरेच माझे पत्रकार मित्र तिथं समोर उभे होते आणि जो डेटा माझ्यापर्यंत पोहोचला मी डोक्याला अक्षरशः हात लावला. ज्या मुजोरीने हा व्यक्ती चालत होता ज्या पद्धतीने बिहेव करत होता. जे चिंगम खाऊन वगैरे तोंडाने चगळत वगैरे तो बोलत होता. असं चालण्याची पद्धत, शर्ट ओपन करण्याची पद्धत, जो अटीट्युड त्याचा दिसत होता, हा नालायकपणा आहे. आणि ही पैशाची मस्ती आहे. एक कामगार एवढ्या अटीट्युडचा असू शकतो, तर त्यांचा मालक अंबानी काय लायकीचा असेल ? हे बघणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही जिओ सिम कार्ड बंद करताय म्हणून तो इथे आला होता. बिलकुल नाही, त्याच येण्याच कारण सुद्धा मला क्लिअर झालेल आहे आणि ते सुद्धा मला काही सूत्रांकडून कळालेल आहे. त्याचं मेन कोल्हापूरला येण्याच रिजन हे होतं की अनंत अंबानीची बदनामी होते आणि लोक त्याच्याबद्दल जे बोलतायत ते होऊ नये म्हणून तो इथं आला होता.
क्लियरली पीआर स्टंट आहे. या वनतारासह अंबानी सगळ्या लोकांचा चेहरा वेगळाच आहे. या अंबानीचे तर दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. त्याची हिस्ट्री काय आहे ? त्याने काय गुण उधळलेत ? एकदा जाऊन बॅकमध्ये चेक करा. बरेच लोक अंबानीचे भाषण ऐकतात आणि म्हणतात अरे वा भाईने क्या बोला, मोठा भाई का छोटा भाई काय बोलतो, मी कधीही एखाद्या बिझनेसमनला वाईट बोलू नका पण एवढा माज आणि एवढी मस्ती आली तर ते बोलणं बंधनकारक आहे, कारण जर आपण प्रत्येक वेळी आणि प्रत्येक गोष्टीसाठी गप्प बसत गेलो तर हे लोकं आपल्याला कच्चा खाऊन टाकतील. बऱ्याच लोकांनी मला मेसेज केले जे काही मी संपादकीय मधून लिहितोय, बोलतोय त्याचे कौतुक केलं. बऱ्याच लोकांनी याची प्रशंसा केली हे सगळं ठीक आहे पण बोटावर मोजण्या इतक्या काही लोकांनी कमेंटपण केल्या परंतु त्या प्राण्याचं काय वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल मी पुढे येतोय पण एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाच हत्यार "नाक दाबलं की तोंड उघडत" मग नाक काय आहे हे आपल्याला कळालं सो क्रिटीसाईज जेवढं अंबानीला करू तेवढं आपला हत्ती परत येण्याचे चान्सेस जास्त आहेत. एवढंच लक्षात ठेवायचं कि काही शब्द रागाच्या भरात माझ्या तोंडातून जातात पण मी काही करू शकत नाही. कोल्हापुरी आहे तेवढं मला दाखवावच लागेल.
स्टेप बाय स्टेप मी काही मुद्दे तुम्हाला मांडतोय जेव्हा हे वनताराचे सीईओ आले होते तेव्हा नेतेमंडळी तोंड उघडायची बंद होतात. एखाद दुसरा तिसरा कोणीतरी अपवाद असेल त्यांचे आपण कौतुकच करू पण मॅक्सिमम नेते मंडळी मान खाली घालूनच असतात आणि हे जेव्हा मी बघितलं त्या व्हिडिओमध्ये तेव्हा मी आकलन केलं, डोक्याला मी हात लावला, एवढी पण भीती बरोबर नाही. आपला अभिमान, आपला स्वाभिमान आणि आपला कणखरबाना हा तुम्हाला दाखवावाच लागेल. हे प्रश्न तुम्ही तुमच्या नेत्यांना १०० टक्के विचारले पाहिजेत. एखादा व्यक्ती जर त्यांच्या विरोधात बोलत असेल तर त्याची बदनामी केली जातील. २०१८ ला माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक काम केलं की, जो माहूत सोडून गेला किंवा त्याला जावं लागलं त्यासाठी हत्तीला वनविभागाने काही काळासाठी घेऊन जावं आणि त्याच्या जागी आम्ही दुसरा माहूत आणू त्यानंतर आम्हाला परत द्या तोपर्यंत तो हत्ती वनविभागाने त्यांच्याकडे ठेवून घ्यावा अशी विनंती केलेली होती. असं पत्र केलेलं होत पण वनविभागाने क्लियरली त्याला नकार दिला आणि यालाच वेगळ्या प्रकारे आता पीआर करून दाखवलं जातंंय. एक मराठी चॅनल आहे क्लियर जातीय समीकरण तिथ जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. हा नेता तिथे आला, हा या जातीचा आहे, तो नेता तिथे आला हा त्या जातीचा आहे, महाराष्ट्रामध्ये एकच जात आहे, ती म्हणजे मराठी. इथं हिरवा, पिवळा, निळा, पांढरा, ज्याच्या त्याच्या घरात आणि ज्याच्या त्याच्या मंदिरात असतो. हे डोक्यात फिक्स ठेवायचं आणि जिथं मराठी हा शब्द येतो तिथं प्रत्येक जण एकत्रित येण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला मी अजून एक माहिती देतो इस्माईल महात हा व्यक्ती कोण आहे माहित आहे ? हा आपल्या महादेवीचा सध्याचा माहूत आहे. विचार करा हा एवढा रडत होता, एवढे अश्रू त्याच्या डोळ्यात येत होते, एवढ्या पोट तिडकीन तो सांगत होता कि ह्या हत्तीणीला घेऊन जाऊ नका. इथं जातीय समीकरण चालत नाहीत आणि यालाच म्हणतात पीआर स्टंट. अननेसेसरी या सगळ्या गोष्टी क्लब करून कुठेतरी निगेटिव्ह पीआर करायचा आणि लोकांच्या मनामध्ये ठासवायचं. आता आनंद अंबानी असेल किंवा इतर सगळे लोक माधुरीचे व्हिडिओ पोस्ट करतायत, बघा माधुरी जंगलामध्ये गेली.
हे झालं ते झालं तुम्हाला माहिती आहे का हे अभयारण्य कुठे आहे ? यांच्या स्वतःच्या रिफायनरीज तिकडे मरणाचंं प्रदूषण करतायत. अखंड भारत देशात सगळ्यात जास्त प्रदूषण करणारी यांची रिफायनरी कंपनी आहे. हे सर्च करा तुम्हाला कळेल. आता याचा पुढचा भाग सांगतो हे करत असताना ज्या लोकांनी यांच्यावर टीका केल्या यांच्यावर जे आरोप करण्यात आले आणि ज्या काही गोष्टी सिद्ध झाल्या त्याचे प्रूफ सोशल मीडियावर टाकण्यात आले. वेगवेगळ्या पोर्टलने ते पोस्ट केले. एवढंच नाही तर जे न्यूज पोर्टल आहे त्यांनी पण पोस्ट केले. पण कालांतराने ते सगळ्या पोस्ट फोर झिरो फोर ची एरर येतात किंवा त्याच यूआरएलला अपग्रेड करून यांची तारीफ करण्यात येते. का बरं यांच्यासमोर कुठलाही नेता बोलू शकत नाही, यांच्यासमोर कुठलाही व्यक्ती स्वतःची ताकद दाखवू शकत नाही, कारण त्याला कसं संपवायचं हे यांना चांगलंच माहिती आहे. पण या गोष्टी जर वाढायला लागल्या ना देश संपून जाईल आणि याला जबाबदार तुम्ही आहात. लक्षात ठेवा काट्यांनीच काठा निघतो. तुम्हाला वाटत असेल जिओचाच सिम कार्ड बंद केलं म्हणजे फरक पडेल. अंबानी यांचा लाखो कोटीचा टर्नओव्हर आहे. तुमच्या हजार दहा हजार एक लाख लोकांनी जरी बिझनेस यांच्यासोबत बंद केला ना उद्या हा व्यक्ती १० बिझनेसेस उभा करतोय. याला एकाच गोष्टीची काळजी आहे आणि तो म्हणजे स्वतःचा पीआर, स्वतःची रेपुटेशन, ती जेवढी बाद होत जाईल तेवढी त्याची वाट लागत जाणार आहे.
कोल्हापूरकरांनी जेव्हा अंबानी यांचा एक फोटो लावला होता ना डिजिटल बोर्डवर आणि त्याच्यावर जे काही उद्योग केले होते ते खरं अंबानी यांना टोचलंं आणि आता तुम्हाला कळालं नाक कसं दाबायचं, त्यामुळे सोशल मीडियावर जेवढे ठासता येईल तेवढे ठासायला चालू करा, प्रत्येक जण बाहेर येऊन हातापाई करायची काही गरज नाहीये, मारामारी करायची बिलकुल गरज नाहीये, आपण संविधानानेच चालूया, शांतपणानेच चालूया, महावीर भगवान व महात्मा गांधी यांच्याच सिद्धांतावर आपल्याला चालायच आहे. शांतपणे शांत डोक्याने डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारे वाद घालून, दंगा करून काही होणार नाही. करेक्ट मार्गाने करेक्ट कार्यक्रम कसा केला जातो ना हे एक छोटासा कोल्हापुरातला व्यक्ती तुम्हाला दाखवून देईल. फक्त तुम्ही या गोष्टी फॉलो करायला चालू करा. वनतारा जिथं आहे जिथे हे रिफायनरीतून प्रदूषण करतात, त्याचे कार्बन क्रेडिट घेण्यासाठी नाटक केली जातात. हा माझा क्लियर आरोप आहे. कुठलंही यांना जनावरांच प्राण्यांच किंवा या सगळ्या निमल्सवर प्रेम आहे हे सगळं नाटक आहे. थोतांड आहे. कुठलाही बिझनेसमॅन या गोष्टीसाठी स्वतःचा वेळ देणार नाही. इन्क्लुडिंग बिल गेट्स आता त्याचं फाउंडेशन कसं चालवतो आणि तो कसा पैसा रूट होतो हे सुद्धा माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत पण आपण तेवढे मोठे नाही आहोत आणि आपल्याला कसं दाबायचं हे त्यांना माहिती आहे. मग काट्याने काटा कसा काढायचा, काट्याने काटा काढण्यासाठी तुम्हाला पहिला मोठ व्हायला पाहिजे. स्वतःची विचारसरणी बदला, स्वतःच्या कुटुंबामध्ये, स्वतःच्या फॅमिलीमध्ये, स्वतःच्या जवळच्या लोकांमध्ये, स्वतःच्या गावामध्ये जो व्यक्ती मोठा होतोय त्याला सपोर्ट करा. त्याला मॅक्सिमम मोठा करण्याचा प्रयत्न करा. आपण दुकानदारांना सोडून ऑनलाईन सगळ्या गोष्टी परचेस करायला जातो आणि त्यात आपला नालायकपणा पुढे असतो. हा त्या जातीचा, हा या जातीचा नका करू. त्याला धंदा शिकवा, चार पैसे जरी महाग असतील तरी त्याला समजावून सांगा तू फक्त यात पाच पैसे मिळव. तो एक रुपया मिळवतोय ऑनलाईन मिळवू दे तू पाच पैसे मिळव पण तुझा धंदा वाढेल. लोकं तुझ्याकडे येतील, थोडं मला स्वस्त हवाय बघ पण मला खरेदी तुझ्याकडून करायची आहे. या गोष्टी फॉलो करायला जरा सुरुवात करा आणि महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती मराठी आहे आणि आपला आहे हे समजून घ्या. अननेसेसरी आपल्या आपल्यात भांडत बसू नका. याचाच राजकीय लोक फायदा घेतात.
वनतारामध्ये तापमान जाऊन बघा ३५ ते ४५ डिग्री तापमान पाहायला मिळतं आणि हे हत्तींसाठी बिलकुल योग्य नाहीये. जे नाटक, जो पुळका या लोकांना येतोय ना, हातावरच्या फोडाप्रमाणे त्या माधुरीला जपलं गेलय कोल्हापूरमध्ये आणि तुम्ही कुठलं नाटक सांगताय की तुम्ही जपताय ते त्यांना इम्पॉसिबल आहे. आनंत अंबानी जेवढं नाटक करेल ना तेवढं मी तुमच्यासमोर त्याला घेऊन लिखानातून एक्सपोज करण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त पेशन्स आणि प्रॉपर वेने जाण्याचा प्रयत्न करा. तो सीईओ म्हणतो की आपण कायदेशीर लढाई लढू. आपण काय करू तुम्ही कोर्टात जा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. का आम्ही झक मारायला कोर्टात जायचं ? केस केली तुम्ही, लढवलं तुम्ही, तुम्ही कोल्हापूर भागामध्ये चंदगड, आजरा या भागामध्ये जर तुम्ही गेलात हत्तींनी, रान गव्यांनी धुमाकळ घातलाय. त्यांना घेऊन जा लोक त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करतायत. काही शेतकरी हे करू नये त्यांनी पण करतायत. सापळा रचतायत, करंट लावतात, अरे त्याच्या पिकाच नुकसान होते. आधीच त्याचा हातावरच पोट दोन वेळेच खायला मिळत नाही तिथं वाघ आणि बिबट्या घुसायला लागलेत त्यांना घेऊन जायचं ते तुम्ही घेऊन जात नाही पण इथं जेनेटिक्स इथं वेगळाच, तुमचा इंटरेस्ट त्या पण गोष्टी मी हळूहळू एक्सपोज करणार आहे, मोठमोठे ब्रँँड, मोठमोठे पीआर करणारे ब्रँँड कोल्हापूरकरांनी असे उधळून लावलेत आणि आता फक्त कोल्हापूरकर नाही तर अखंड महाराष्ट्र यासाठी झटतोय आणि म्हणूनच मी संपादकीय मधून लिखान करतोय. तुम्हाला काळजी आहे का प्राण्यांची सांगा ना ? हॅशटॅग चालवा, ब्रिंग माधुरी बॅक किंवा अजून हे दोन तीन हॅशटॅग मॅक्सिमम रन करण्याचा प्रयत्न करा. यांचीही वाट लागलीच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक देवावर आणि प्रत्येक देवाच्या प्राण्यावर तुम्ही घाला घालायचा प्रयत्न करणार आणि ते बंद व्हायला पाहिजे आणि एवढाच पुळका होता ना ? तर मरायला गुजरातला जायची गरज नव्हती, मरायला वनतारामध्ये आमच्या माधुरीला नेण्याची गरज नव्हती, भरपूर सारे अभयारण्य महाराष्ट्रात आणि आम्ही जिथे राहतो ना खूप चांगली हवा आहे. खूप सारं जंगल आहे आणि खूप चांगलं वातावरण आहे. आमच्या यांची चिंता करायची तुम्हाला गरज नाही. तुम्ही तुमचा पैसा, कंपनी आणि तुमचा स्वार्थ तुम्हाला लखलाब आमच्याशी पंगे घेण्याचा प्रयत्न करू नका मग कुठल्याही थराला जायला लागलं तरी चालेल पण आम्ही आमचा स्वाभिमान खुंटीला टांगणार नाही.