संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधित
schedule04 Sep 25 person by visibility 82 categoryक्राइम न्यूजसांगली

संजय तोडकर (सांगली) - सांगली जिल्ह्यातील संजयनगर पोलीस ठाणे हद्दीत २०२० ते २०२४ या कालावधीत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील झालेल्या सागर धनाजी लोखंडे यांच्या टोळीला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत पारीत करण्यात आला असून या कारवाई अंतर्गत टोळीचे प्रमुख सागर लोखंडे आणि सदस्य राज द-याप्पा यादव, अजय राजेंद्र पाटील हेही समाविष्ट आहेत.