सुशांत पोवार (विशेष वृत्त) - नेमकं माधुरी हत्तीनीला अनंत अंबानीच्या वनतारामध्ये घेऊन जाण्याची नेमकी मेक आहे तरी काय ? नेमका हा हट्ट कशासाठी होता, की अंबानीला तो हत्ती त्यांच्या वनतारामध्ये पाहिजेच होता ? याचं कारण काय आहे ? आणि त्यांनी हा हत्ती मिळवण्यासाठी काय काय केलं, काय काय नाही ते सगळं सविस्तर निर्भीड पोलीस टाइम्सच्या विशेष वृत्तात पाहणार आहोत...
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर आमच्याकडे काही चंदन चोर महाभाग राधानगरी पट्ट्यात आहेत. हे चंदन चोर लोक काय करतात तर, दिवसा शेतकऱ्याकडे जातात आणि म्हणतात तुमचं चंदनाच झाड एवढ्या वेळाला आम्हाला विकत द्या. शेतकरी म्हणतो बाबा मला तुझ काही ऐकायचं नाही. मला आताच ते झाड देण्याचे काही कारण नाही. मी थोडे जास्त पैसे आल्यावर आणि थोड मोठं होऊ देत मग देतो. मग हे चंदनचोर काय करतात कि, ठीक आहे तुमच्या मनाने जेव्हा द्यायचं तेव्हा द्या. असे बोलून बरोबर पुढच्या आठ दिवसात रात्री जाऊन त्या चंदनाच्या झाडावर दरोडा टाकतात म्हणजे चंदनाचे झाड तोडून घेऊन जातात. तसेच ते झाड चंदनचोर फुकटात घेऊन जातात आणि त्या चंदनाच झाड घेऊन जाणारा सेम टू सेम दरोडा पडलाय त्या माधुरी हत्तीनीवर, कसा पडलाय ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे.
महादेवी हत्तीणसाठी पेटा संस्थेने एवढ्या लवकर सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने एवढ्या लवकर जलद निर्णय दिला. एकीकडे हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, कर्जमाफीचे प्रकरण आहेत ते निकाली निघत नाहीत. वारंवार दिवसा ढवळ्या लहान लहान मुलींवर बलात्कार होत आहेत. लहान लहान मुलांना पैशासाठी किडनॅप केले जातेय. अक्षरशः ऑरगन्स विकल्याची उदाहरणे आहेत. त्याच्यावर न्यायप्रक्रियेत जलद निर्णय होत नाहीत. बॉम्बस्फोट झाले किंवा आतंकवादी हल्ले झाले. त्याचे २० - २० वर्ष निकाल लागत नाहीत. पण अवघ्या काही महिन्यांमध्ये पेटासारखी संस्था सुप्रीम कोर्टात जाते. सुप्रीम कोर्ट निर्णय देतं की इथला हत्ती उचला आणि काय करा तर अनंत अंबानीच्या वनतारामध्ये घेऊन जा. ही नेमकी भानगड काय आहे ? लय खतरनाक भानगड आहे सध्या ? नुसतं तुम्ही वनतारा नाव ऐकलंय पण वनताराकडे जमीन किती आहे माहिती आहे का तुम्हाला ? वनताराची 3 हजार एकर जमीन आहे. नुसती वनताराकडे एवढीच जमीन नाही. तर एकूण रिलायन्सची जमीन पाहिली तुम्ही ? गुजरातमधली तर 20 हजार एकर जमीन आहे. याच्यातली १९९० ला तत्कालीन शासनान जेव्हा बीजेपी आणि जनता दल दोघाच एकत्र सरकार होतं तेव्हा त्यांनी ती अंबानी यांना दिलेली आहे. त्याच्यानंतर २००१ पासून २०१४ पर्यंत जवळपास १० ते १२ हजार एकर जमीन दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. म्हणजे बघा ही सगळी २० हजार एकर जमीन आहे अंबानीकडे.
बघा आता त्यांनी काय केलं होत, सुरुवातीला जाऊन त्यांच्या वनतारामध्ये एक सीनियर हत्ती पाहिजे होता जो की त्यांच्या इशाऱ्यावर चालेल. म्हणजे जो माणसाळलेला आहे सीनियर आहे आणि वनतारा म्हणलं तसं वागेल बस म्हणलं की बसेल उठ म्हणलं की उठेल कारण तिथे वेगवेगळी मोठमोठी माणस येतात वनतारामध्ये. म्हणजे काय तर फक्त आणि फक्त काय प्राण्यांच्या संरक्षणासाठीच आहे का ? आणि जर तसं असतं आणि पेटानं जर फक्त आणि फक्त की या हत्तीचा म्हणजे माधुरी नावाची जी हत्ती आहे त्या हत्तीनीला फक्त इथं त्रास होतोय किंवा तिची काळजी घेतली जात नाही म्हणून जर सुप्रीम कोर्टात गेली असेल आणि सुप्रीम कोर्टाने जर त्याला तिकडे पाठवा म्हणलं असेल तर पेटा इतके दिवस काय डोळ्याला फडके लावून बसली होती का ? हा पहिला प्रश्न आहे.
इथं याच्या आधी समृद्धी महामार्ग झाला. ४८ ते ५० हजार झाड तोडली गेली. एका झाडावर किमान हजार वन्यजीवांचा वास असतो. म्हणजे किडे, मुंग्या, पक्षी, पाखरं, अंडे, सगळं असतं तुम्ही त्याचे फोटो सोशल मिडियावर पाहिले असतील की झाडं तोडताना कसे अंडी पडली, काय तेव्हा पेटाच्या डोळ्यात काय माती पडली होती का ? तेव्हा पेटा का सुप्रीम कोर्टात गेला नाही ? की या रोडपाई ४८ हजार झाडं म्हणजे प्राणी आणि पक्षांची लाखो घर नष्ट होत आहेत. तेव्हा कुठे गेल होत पेटा ? आता शक्तिपीठ महामार्ग होतोय, डायरेक्ट कोकणातून जातोय, त्याच्यामध्ये सुद्धा लाखो झाडे तोडली जाणार आणि ही फक्त ती झाडंं त्या रस्त्यात आली म्हणून तोडली जाणार नाहीत तर त्याच्यापेक्षा मोठं सांगतो याच्यामध्ये जे मुरूम वापरला जातोय, तो मुरूम आहे ना ? गिट्टी मुरूम आणि खडक जे वापरला जातो, डोंगरच्या डोंगर पोखरत चालली आहेत. त्याच्यातले हजारो लाखो झाडं तोडत चालली आहेत. तिथलं वन्यजीवांचा सगळ्या सत्यानाश होऊन जाणार आहे. प्राणी, पशु, पक्षी सगळं पर्यावरण नष्ट होत चालले आहे तेव्हा काय पेटाच्या डोळ्यात काय माती गेली होती का ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता विरोध केला नाही तर परत कधीच नाही. आता हाणून पाडले तर परत हि हिम्मत पेटा सारख्या संस्था माणसांच्या भावनेशी खेळणार नाहीत.......