बीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायब
schedule03 Aug 25 person by visibility 87 categoryसिंधुदुर्ग

दिनेश मयेकर (सावंतवाडी) - सावंतवाडी तालुक्यातील आजगांव तसेच वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे बीएसएनएल कंपनीने चार वर्षांपूर्वी मोबाईल टॉवर उभारला होता.त्या टॉवरमुळे गेली तीन-चार वर्षे लाईट गेल्यावर पंचक्रोशीतील गावातील बीएसएनएलची रेंज गायब होते.त्यामुळे "टॉवर लावलाय नावाला अन् रेंज नाही गावाला" अशी अवस्था आजगांव गावांसह पंचक्रोशीतील गावांमधील मोबाईल धारकांची झाली आहे.