वैभववाडी येथील राज्य महामार्गावरील चिखलमय खड्ड्यात फुलणार "आंदोलनाची" हिरवीगार झाडे
schedule02 Aug 25
person by
visibility 92
categoryसिंधुदुर्ग
दिनेश मयेकर (सावंतवाडी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यामधील प्रमुख राज्यमहामार्गावरील रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली असून गणेशोत्सवापूर्वी सदर खड्डे न बुजवल्यास त्यामध्ये वृक्षारोपण झाडे लावा, झाडे जगवा करण्याचा अनोखा इशारा एका राजकीय पक्ष पार्टीने दिला आहे.या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फोंडा-वैभववाडी-उंबर्डे व उंबर्डे-भुईबावडा या महत्तवाच्या महामार्गांवर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत.विशेष म्हणजे 2020-2021 साल मध्येच या रस्त्याचे नूतनीकरण झाले होते.मात्र दोन वर्षातच रस्त्यांची झालेली दुर्दशा पादचाऱ्यांसाठी व वाहन चालकांसाठी धोक्याची घंटा वाजवत आहे.या पाश्वभूमीवर वैभववाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.मंगेश लोके साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला 7-8 दिवसाचा कालावधी दिला असून लोके साहेब यांनी सार्वजनिक विभागाच्या उपअभियंता साहेबांना निवेदन दिले आहे.