सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा येथील विद्युत पोलवर तागंठी तलवार
schedule02 Aug 25
person by
visibility 102
categoryसिंधुदुर्ग
दिनेश मयेकर (सावंतवाडी) - तिरोडा गावातील विद्युत वाहक पोल कोसळण्याच्या स्थितीत असून त्यांना ग्रामस्थांच्या वतीने काठीचा आधार दिला जाईल.तसेच सदर विद्युत पोलवरील तारा खाली लोंबकळत असल्याने त्या ताऱ्यांमुळे ग्रामस्थ, वाहनधारक व अन्य प्राण्यांवर जीवितहानी झाल्यास त्याला सर्व महावितरण विभागचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहणार.
तिरोडा गावात सध्या बऱ्याच ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर व विद्युत पोलवर झाडी-झुडपे वाढून ते धोकादायक स्थितीत आहेत.त्यामुळे नेहमी प्रमाणे जरा कुठे पाऊस-वारा आला की कायमच येथील लाईट ये-जा होत असते.तरी येत्या 1-2 दिवसात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर घटनेबाबत दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.