Breaking : bolt
काही नेत्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे जयंत पाटील - बाळासाहेब थोरात ठरले महाराष्ट्रात नंबर एकचे नेते....बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंदराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपकोट्यवधींचा औषध खरेदी घोटाळा उजेडात, कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची "आरोग्य भवन" वारी ?ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !केंद्र सरकारची मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे कोंडी होण्याची शक्यता, २४ तासात महाभियोग आणण्याची तयारी.....स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून कोकणात महायुतीतील बडे नेते राणे - सामंत यांच्यात तणाव.....?

जाहिरात

 

दापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !

schedule03 Aug 25 person by visibility 95 categoryमहाराष्ट्र

दापोली प्रतिनिधी - कै.कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानच्या 'युवा प्रेरणा कट्टा' टीमने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दापोलीत ' एक राखी जवानांसाठी; देशाच्या रक्षकांसाठी ' हा उपक्रम आयोजित केला होता. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ज्या भारतीय सैन्य दलानी पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानी आंतकवाद्यांना धडा शिकवला त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणे हा यावर्षीच्या अभियानाचा मुख्य उद्देश होता. 

                  दापोलीतील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि काही सामान्य नागरिक महिला भगिनी यांनी या उपक्रमात राख्या जमा केल्या. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद पांगारकर,नचिकेत बेहरे,संदीप गरंडे, श्रीप्रीती वैद्य, साक्षी करमरकर, सुमेध करमरकर , रोहन भावे इ. कार्यकर्त्यांसह युवा टीमने मेहनत घेतली.  या उपक्रमाबाबत बोलताना मिहीर महाजन म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा २०२२ मध्ये प्रथमच या उपक्रमाची सुरुवात आपण करत ७५ हून अधिक शाळा/महाविद्यालयांतून राख्या जमवून सीमेवर पाठवल्या होत्या. तेव्हापासून दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला जातो.यावर्षी जमलेल्या राख्या पठाणकोट (पंजाब) येथील भारतीय वायू सेनेच्या हवाई तळावरील जवानांना तसेच मुंबई येथील सशस्त्र सेना सामान चिकित्सा डेपो येथील ऑफिस मध्ये देखील रवाना करण्यात आल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes