अनधिकृत अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई, ५ हातगाड्या, १५ स्टॅण्ड बोर्ड, स्वागत कमान जप्त
schedule16 Jul 25 person by visibility 24 categoryकोल्हापूर

सुशांत पोवार (कोल्हापूर) - शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून टाऊन हॉल, सी.पी.आर. चौक, पावर्ट टॉकीज चौक व सायबर चौक परिसरातील सिग्नल जवळील अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 5 हातगाड्या, 15 लोखंडी स्टॅण्ड बोर्ड, 8 लोखंडी जाळ्या व 1 स्वागत कमान जप्त करण्यात आली. तर 33 हातगाड्या मालकांनी स्वयं हून हटवल्या. शनिवार, दिनांक 12 जुलै 2025 रोजी पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक कोंडी व अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. यामध्ये सिग्नलजवळील अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने आज ही संयुक्त कारवाई केली.