Breaking : bolt
पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !महाराष्ट्रात निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यामागे राज - उद्धव युतीच्या घबराटीचं सावट ?अंबानींंच्या बदनामीसाठीचं सीईओ कोल्हापुरात, त्यांचा अटीट्युड आणि एवढी पण भीती बरोबर नाही !समृद्धी महामार्गातील हजारो झाडांच्या कत्तलीत लाखो पशु-पक्षी रस्त्यावर आली, तेव्हा "पेटा" कुठे होती ?वैभववाडी येथील राज्य महामार्गावरील चिखलमय खड्ड्यात फुलणार "आंदोलनाची" हिरवीगार झाडेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा येथील विद्युत पोलवर तागंठी तलवार

जाहिरात

 

जलजीवन मिशन अंतर्गत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

schedule10 Jun 25 person by visibility 105 categoryकोल्हापूर

संजय सुतार (कोल्हापूर) - जलजीवन मिशन अंतर्गत असणाऱ्या पाणीपुरवठ्याची सर्व कामे जलदगतीने मार्गी लावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी स्वच्छता समितीची सभा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तथा समितीचे सदस्य सचिव अर्जुन गोळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, तसेच भूजल सर्व्हेक्षण व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

               जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तसेच ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण मार्गी लावण्यासाठी योग्य नियोजन करा. जलजीवन मिशन अंतर्गत कामांचा प्रगती अहवाल वेळेत सादर करा. पूर्ण झालेल्या योजनांची माहिती गतिशक्ती पोर्टलवर अपलोड करा. योजनांच्या सुधारित अंदाजपत्रकांचे प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर सादर करा. कोणत्याही प्रस्तावात त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्या. कामे पूर्ण करताना कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्या. जलजीवन मिशन योजनांना वीज पुरवठा उपलब्ध होण्यासाठी महावितरण विभागाचा ए वन फॉर्म भरुन घ्या. ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून पाणीपुरवठा योजनांची वीजेची थकबाकी भरुन घ्या.

          मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत कामांचे योजना निहाय पूर्ण करण्याचे नियोजन सादर करा. ग्रामपंचायतीशी समन्वय साधून पूर्ण झालेल्या योजना हस्तांतरित करा.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes