10 वी, 12 वी जून-जुलै परीक्षा मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती
schedule18 Jun 25 person by visibility 45 categoryकोल्हापूर

संजय पोवार - वाईकर (कोल्हापूर) - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा जून-जुलै २०२५ दिनांक २४ जून २०२५ पासून सुरू होत आहेत. परीक्षांसदर्भात विद्यार्थी तसेच पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना आणि पालकांना मदतीची आवश्यकता भासल्यास शंका निरसनासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने नियुक्त केलेल्या समुपदेशकांशी संपर्क साधण्याचे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव सुभाष रा. चौगुले यांनी केले आहे.