Breaking : bolt
आरोग्यचे आयुक्त अँक्शनमोडवर, मनपाचे आरोग्य अधिकारी यांची बदली आणि चौकशीचे आदेशडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात....'मॅनेज' निविदेचा प्लॅन उधळला ? आता दोषींच्या चौकशीअंती निलंबनाची मागणी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण असताना धाराशिवमध्ये बोगस औषधे पोहचली कशी ?आयपीएस अधिकाऱ्या विरोधात महिला डॉक्टरने दाखल केला बलात्काराचा गुन्हाबोगस डॉक्टरांकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समितीचे दुर्लक्ष रुग्णांच्या जीवावर ?दिनांक १३ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ चे साप्ताहिक राशिभविष्यपुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमालातूर जिल्ह्यात येणार २ हजार २६८ कोटींची गुंतवणूकसिंधुदुर्गमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जाहिरात

 

आजचे दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२४ चे राशिभविष्य

schedule31 Oct 24 person by visibility 153 categoryराशिभविष्य

मेष राशी
आज मनोरंजक आणि नियोजित गोष्टींमध्ये व्यस्त राहणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरेल. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये मधुर अनुभवांची आदान-प्रदान होईल. त्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल. आज तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या टीमसोबतींसोबत मिळून जे काही काम कराल ते यशस्वी होईल. तुमच्यापेक्षा अनुभवी आणि हुशार लोकांकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्ही खूप आनंदी राहाल. तुमचे पैशांच्या बाबतीत जे काही वाद होते ते आज सुटतील. आज तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ आहे.
वृषभ राशी
आज तुमचे काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज आहे. नवीन कामाची सुरुवात टाळा. घरी आणि कामाच्या ठिकाणी जीभेवर नियंत्रण ठेवा. संध्याकाळी जोडीदाराबरोबर शॉपिंगला जाऊ शकता. आज भाग्य 89% तुमच्या बाजूने राहील, माता लक्ष्मीची पूजा करा.
मिथुन राशी
आज देवदर्शनाला जाण्याचा योग आहे. आज तुम्ही एक चांगला व्यावसायिक करार कराल. तुमचा व्यवसाय वाढेल आणि तुम्हाला पैसा मिळेल. तुम्ही जे काही बुद्धीचे काम करत असाल त्यात तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. दूरचा प्रवास टाळा. शेजाऱ्यांशी संबंध चांगले ठेवा.
कर्क राशी
आजचं कोणतंही काम नशीबावर सोडू नका, नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीवर वरिष्ठ प्रसन्न होतील. पदोन्नतीचे योग आहेत. सासूरवाडीत उधार देण्याचे टाळा. आज भाग्य तुमच्या बाजूने 66% राहणार आहे, आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या.
सिंह राशी
आज तुमच्यामध्ये रचनात्मक कामांची आवड वाढेल, पण व्यवसायात आर्थिक तंगी येऊ शकते. संध्याकाळी जुना मित्र भेटेल. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी लहान-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आज तुमचे भाग्य 88% तुमच्या बाजूने आहे. देवाची आराधना करा. प्रेयसीशी वाद होतील. गृहिणीसाठी आजचा दिवस दगदगीचा जाईल.
कन्या राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमची कामे मार्गी लागतील. व्यवसायात येणाऱ्या समस्या सोडवण्यात यश मिळेल. कुटुंबात काही वाद होऊ शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष करा. मुलांच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्यासाठी आई-वडिलांचा सल्ला घ्या. आजचे भाग्य तुमच्या बाजूने आहे. गरजूंना मदत करा.
तुळ राशी
राजकारणात असलेले लोक उत्साहाने काम करतील. व्यवसायात पैशाची कमतरता भासू शकते. आज कोणाशीही आर्थिक व्यवहार टाळा. व्यवसायात नवीन कल्पना पुढे नेल्याने भविष्यात फायदा होईल. आज भाग्य तुमच्या बाजूने 95% राहिल. धार्मिक कार्यात भाग घ्या. गावाला जाण्याचं टाळा. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशी
आज तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला प्रशंसा मिळेल. तुमची मेहनत फळाला येईल. काही अनावश्यक खर्चांमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. जीभेवर नियंत्रण ठेवा. सासूशी वाद होतील. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या पालकांच्या सल्ल्याची गरज भासेल. आज तुमचे भाग्य 82% तुमच्या बाजूने आहे. लग्नाळूंच्या हाती आजही निराशा येईल. दूरचा प्रवास करण्याचा योग आहे.
धनु राशी
आजचा दिवस मुख्यतः दैनंदिन कामांमध्ये निघून जाईल. कोणत्याही कायदेशीर दस्तऐवजावर हस्ताक्षर करण्यापूर्वी विचार करा, अन्यथा अडचणी वाढू शकतात. मुलांच्या कामामुळे समाधानी व्हाल. आज भाग्य तुमच्या बाजूने 76% राहणार आहे. खरेदीमुळे खर्च वाढणार आहे. घरी पाहुणे आल्याने विनाकारण खर्च वाढणार आहे. नवीन मैत्रीण भेटण्याची शक्यता आहे.
मकर राशी
आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या कामातील अडचणी दूर करण्यात यशस्वी व्हाल. सकाळपासूनच तुम्हाला शुभ बातम्या मिळत राहतील आणि दिवस सुखकर जाईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रेमसंबंधात काही तणाव असू शकतो. आज तुमचे भाग्य 89% तुमच्या बाजूने आहे. घरात वाद होतील. पण संध्याकाळपर्यंत वातावरण निवळेल. बाहेर जाण्याचा बेत कराल.
कुंभ राशी
तुमचे स्थान निर्माण करण्यासाठी काळजीपूर्वक काम करा. काही काळासाठी नवीन डील टाळा. आरोग्य चांगले ठेवा. प्रवासाची शक्यता आहे. दुपारनंतर तुम्हाला समस्यांतून मुक्ती मिळेल. आज भाग्य 97% तुमच्या बाजूने असेल. कोर्ट कचेरीच्या कामातून मुक्ती मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा ताबा मिळेल.
मीन राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असणार आहे. अचानक आर्थिक लाभ होईल. एका मोठ्या संकटातून तुमची सुटका होणार आहे. पूर्वीच्या काही चुकांमधून हे संकट निर्माण झालेलं असेल. कुणालाही उसने पैसे देऊ नका. उधारी दिल्यास परत पैसे येण्याची शक्यता कमी आहे. गावाला जाणार असाल तर कुलदैवताला नमस्कार करा. आज तुम्हाला एक दु:खद बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes