पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
schedule21 Nov 25 person by visibility 79 categoryपुणे
पुणे प्रतिनिधी - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून विविध योजनेंची ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ होती, त्यानंतर २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापी नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करण्याकरिता व इतर कारणांस्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी होत आहे.